लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर अनेक शेतकऱ्यांचे पीक पावसाच्या पुरात वाहून गेले. त्यांचे नुकसान विमा कंपनीला कसे दाखवयचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नैसर्गिक नुकसान विमा कंपनीला पुराव्यासह दाखविणे आवश्यक आहे.शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेताना त्यांचा विमा रक्कम कपात करुन पीक कर्ज खात्यात जमा केले जाते. आघाडी शासनाच्या काळात पीक विमा ऐच्छिक होते. पण सध्याच्या भाजप सेना युतीच्या काळात पीक विमा सर्वांना आवश्यक केले आहे. त्यामुळे इच्छा नसताना विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळण्याकरिता विमा योजनेत घालून दिलेले नियम, निकष क्लिष्ट आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे शेतकऱ्यांसह छायाचित्र काढणे, पीक विमा उतरवल्याची बँकेच्या नावांची पावती, नुकसान झाल्याच्या अर्जावर संबंधित कृषी सहायकाची स्वाक्षरी, सातबारा, आठ अ हे दस्ताऐवज नुकसान झाल्याच्या ७२ तासांत म्हणजे तीन दिवसात विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नुकसान ग्राह्य धरल्या जात नाही, हे सर्व अशक्य आहे.यापुर्वी पीक विम्याच्या नुकसानीचा सर्व्हे महसूल विभाग करीत होते. यामध्ये शेतकरी आणि विमा कंपनीचा संबंध येत नव्हता. महसूल विभागच नुकसानीचा अहवाल सादर करीत होता.शेतकऱ्यांची लूट?शासनाने पीक विमा काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका कंपनीस मान्यता दिली आहे. भंडारा जिल्ह्यात अॅग्रीकल्चर विमा कंपनी या खासगी कंपनीस विमा काढण्याचे काम दिले आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकºयांचा विमा जबरदस्तीने उतरविले जाते. पण फायदा आतापर्यंत नाममात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. सर्व प्रकारच्या विम्याकरिता कंपनीचे एजन्ट दारोदारी जातात. त्या विम्याचे नियमाप्रमाणे दावा केल्यास लाभ मिळतो. मात्र, पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची शाश्वती नाही, ही शेतकºयांची लूट आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.पीक कर्ज घेतांना विमा रक्कम कपात करणे बंद झाली पाहिजे, विमा हा ऐच्छिक असावयास पाहिजे आणि विम्याचे नियम, निकष बदलविणे आवश्यक आहे.- विजय काटेखायेशिवसेना प्रमुख, पवनी तालुका
धान पीक नष्ट होऊनही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:02 AM
लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे धानपीक सडले, तर ...
ठळक मुद्देपीक विम्यातील नियम, निकष क्लिष्ट । कोंढा परिसरातील शेतकरी संकटात