लाखांदूर : पूर,किडरोग व परतीच्या पावसाने झालेली पिक हानी यासह उत्पादकतेतील घट लक्षात घेता अंतीम आनेवारित घट दाखवून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतक-यांच्या निर्धार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलन येत्या 31 डिसें. रोजी दुपारी 12 वाजता माजी समाजकल्यान सभापती चंद्रशेखर टेंभूर्ने यांच्या नेतृत्वात लाखांदूर तहसिलपूढे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या खरिपात लाखांदूर तालुक्यास्त तीनदा पुरपरिस्थीती निर्माण झाल्याने सर्वत्र पिकांची नासाड़ी झाली आहे. एवढेच नव्हे तर तुडतुडा व अन्य किडरोगासह परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली आहे. दरम्यान प्रशासनाने यंदाच्या खरिपात सदोष पिक कापणी व मळणी अहवाल शासनाला सादर केल्याचा आरोप करीत तालुक्यात उत्पादकतेतील घट लक्षात घेता आनेवारित घट दाखवून सबंध लाखांदूर तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सदर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या आंदोलनाचे आयोजक चंद्रशेखर टेंभूुर्णे यांनी केले आहे.
शेतक-यांचा निर्धार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:30 AM