लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची देयके थकीत हाेती, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला हाेता. ऐन उन्हाळी पीक शेतात डाेलत असतानाच महावितरणने पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांसमाेर पिकाला पाणी देण्याचे माेठे संकट उभे ठाकले हाेते. परंतु १५ जानेवारी राेजी विधानसभेत शेतकऱ्यांच्या वीज कपातीवर माेठा गदाराेळ आला. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांचे पीक निघेपर्यंत वीज पूर्ववत केली जाईल, अशी घाेषणा दिली. या घाेषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळाला, परंतु किती शेतकऱ्यांची वीज पूर्ववत झाली? ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली त्यांना शेतकऱ्यांना खराेखरच वीज कनेक्शन जाेडून देण्यात आले काय? जर कनेक्शन जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडून देण्यात आले नाही तर केव्हा जाेडणार असा सवाल आहे.
दिवसाही वीज ठेवा
जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव्हा पिकाला पाणी देणार हा प्रश्न आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आदेश पोहोचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार?
कृषिपंपाची वीज जाेडणी पूर्ववत करुन देण्याबाबत ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत मंगळवारी घाेषणा केली. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला वरिष्ठांकडून तसे निर्देश आले नसल्याचे स्थानिक कर्मचारी सांगतात. त्यामुळे आदेश पाेहाेचेपर्यंत आणखी किती जणांची वीज कापणार, हा प्रश्न आहे.
काय आहेत मंत्र्यांचे आदेशकृषिपंपाची देयके थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज पुन्हा तीन महिन्यांपर्यंत कापली जाणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची वीज कापली आहे. त्या शेतकऱ्यांची जाेडणी तीन महिन्यांसाठी केली जाईल, अशी घाेषणा ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत दिली.
शेतकऱ्यांना दिलासा
शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सत्ताधारी नेहमीच सांगतात. परंतु त्यादृष्टीने याेजना तसेच हितकारक नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. माझ्याकडे दाेन कृषिपंपाचे कनेक्शन आहे. रब्बी हंगामात लाईनमनने माझ्या कृषिपंपाची वीज खंडित केली. तेव्हापासून मला पिके घेण्यास अडचणी आल्या. उसनवार घेऊन मी दाेन्ही ठिकाणची थकीत देयके भरली.- एक शेतकरी