शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

सिंचनाअभावी शेतकऱ्यांची दैनावस्था

By admin | Published: December 21, 2015 12:33 AM

स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले.

हरितक्रांतीचे स्वप्न कधी होणार पूर्ण ? : शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुचसंजय साठवणे साकोलीस्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांचे स्वप्न आजही अपूर्ण असून सिंचनाअभावी वर्षानुवर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत जीवन जगत आले. ओल्या दुष्काळापापेक्षा आजवर कोरड्या दुष्काळाचेच शेतकऱ्यांची दैनावस्था केली आहे. शासनाचे दिशाहीन नियोजन राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, व्होटबमकची राजनीती, प्रकल्पनिर्मितीतील दिरंगाई, भ्रष्टाचार निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी लाचारीचे जीवन जगत आहे. शेतकरी आत्महत्या यातूनच जन्माला आले. हा एक भाग असून नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आले. कालच लवारी येथील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपाची व रब्बीची पेरणी खोळंबते. वेळेवर पाणी उपलब्ध नसल्याने पेरणी रोवणी व इतर मशागतीची कामे वेळेवर होत नाही. कामे खोळंबतात व इतर नियोजनही बिघडते. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तुटपुंज्या पाण्यामुळे पिकांची उत्पादकता गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. अल्प उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. हजारो हेक्टर शेतजमीन ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ओलीताची सोय नसल्याने बऱ्याचदा एका पाण्यासाठी शेतकऱ्याला हातचा पिकाला मुकावे लागते. पाऊस पडतो खरा, पण सक्षम यंत्रणेअभावी तो येतो तसा जातो. पाणी अडविण्याचे व साठविण्याचे साधन अपुरे आहेत.शासन शेतकऱ्यासाठी सिंचनाविषयी विविध योजना राबवितो. सिंचनासाठी विहिरी बंधारे, धरणे यावर कोट्यवधीचा खर्च होतो. पण प्रत्यक्षात त्याचा लाभ खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यापर्यंत पोहचताना दिसत नाही. पीक घेताना शेतकरी आपआपल्या पद्धतीने सर्वोतोपरी प्रयत्न करतो. पाणी, खते, बि बियाणे रोगराई किडींचा प्रादुर्भाव मनुष्यबळ पैसा या व इतर बाबी शेती करताना महत्वाच्या ठरतात. मात्र पाणी वगळता इतर बाबीची पूर्णता करताना शेतकरी तिळमात्रही मागे हटत नाही. रक्ताचे पाणी करून अहोरात्र मेहनत करून पोटच्या गोळ्याप्रमाणे पिकाची काळजी घेतो. मात्र शेवटी पावसासाठी हतबल होतो. त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णत: निसर्गावरच अवलंबून राहावे लागते.शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवायचे असेल तर सिंचन सुविधा निर्माण करणे, वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मोठमोठे तलाव, मालगुजारी तलाव, खासगी तलाव, बोळ्यांचे खोलीकरण करणे, साठवण क्षमता वाढविणे, जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली आणणे अत्यंत महत्वाचे आहे.पूर्वीच्या काळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करणारे तलाव आज दहा एकराला सिंचनाची सोय करू शकत नाही ही परिस्थिती आहे.तालुक्यातील प्रकल्पांची अवस्था साकोली तालुक्यात मागील २० वर्षापासून निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र या २० वर्षात या प्रकल्पाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत पूर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील हे शासनालाच ठाऊक. हा प्रकल्प पूर्ण झाल्यस तालुक्यातील २३ गावातील शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो तर भीमलकसा प्रकल्पासारख्या कामाला अजूनही सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे साकोली तालुक्यात सध्यातरी सिंचनाची सोय नाही आहे. ती अवलंबून आहे जिल्हातील फक्त तलावाच्या भरवशावर व निसर्गावर.