शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

फुलकोबीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:17 PM

भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० रूपये पोत्याने विक्री : उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव

मुखरु बागडे।आॅनलाईन लोकमतपालांदूर : भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे. एकाचवेळी फुलकोबीचा हंगाम फुलल्याने कावडीमोल भावाने फुलकोबी विकत आहे. घाऊक भाव दोन रूपये तर चिल्लर भाव चार ते पाच रूपये प्रतिकिलो ने फुलकोबी विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.शेतकरी अफाट आशेपोटी नव नवे पीक घेत नवे काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळसाला पान तीनच या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याच्या नशिबी केवळ दारिद्रच अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात व भंडारा येथील बीटीबी मंडितही फुलकोबीचे भाव घसरले आहे. यामुळे कोबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.महागाईच्या चक्रात सर्वांनीच आपापली स्थाने घट्ट केली खरे पण शेतकरीच असा अपवाद आहे की त्याला महागाईचा फटका बसतो, पण लाभ मिळत नाही. फुलकोबी बियाणा १० ग्रॅमला ४०० रूपये मोजावी लागतात. एक महिना रोपात वाढवावा लागतो. त्यानंतर दोन ते अडीच महिने त्याची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून बाजारात मागणी कोबीला भाव नसल्याने व विक्रीला अधिकच त्रास वाढल्याने फुलकोबीची शेती नाकीनऊ आणणारी ठरली आहे.ढगाळ हवामानामुळे कोबी काढणीला नियमितपेक्षा लवकरच येते. अळीचा, मावाचा त्रास वाढतो. शेतात वाया जाण्यापेक्षा बाजारात जे मिळतील ते म्हणत शेतकरी अख्या परिवारासह फुलकोबीच्या मळ्यात खपत आहे.जेवढ्या दिवस ढगाळ हवामान राहील तेवढे नुकसान कोबीला होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह गारपीटचा अनुमान वर्तवल्याने शेतकरी घाबरला आहे. मागील चार वर्षापूर्वी २२ फेब्रुवारीला अशाच गारपिटीचा तडाखा सहन करीत पूर्ण शेतचे शेत पिकाचे नष्ट झाले होते, ती आठवण अजूनही शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.अत्यल्प पाण्याचा विचार करता मी फुलकोबीचे उत्पादन घेतले. धान निघाल्यानंतर फुलकोबीचा हंगाम सजविण्याकरिता हात उसणवारी करून बागायती शेती केली. अख्खे कुटुंब श्रम उपसतो. यंदा धानही न पिकल्याने बागायत तरी आधार मिळेल अशी आशा असताना तिही मातीमोल ठरली आहे.-मोहन लांजेवार, फुलकोबी उत्पादक पालांदूर.धान निघाल्यानंतर एकाचवेळी बागायतीचा हंगाम येतो. याचा परिणाम बाजारपेठेवर पडतो. जे विकते ते पिकवा हे सुत्र स्विकारले तर बागायतीत नवी आशा निश्चित मिळू शकते. या वर्षाला भेंडी, मिरचीला अपेक्षित भाव मिळत आहे. पावसाळ्याची बागायती निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. शेतकºयांनी गटागटाने पीक निश्चित करून उत्पादन घ्यावे. यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता असते.-बंडू बारापात्रे, थोक भाजी व्यापारी बीटीबी.