शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:36 PM

जिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : जिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करून नुकसान टाळावे, अशा सुचना कृषी संशोधन केंद्राने दिल्या आहेत.तपकिरी तुडतुडे व पिल्ले धानाच्या बुंध्यावर आढळतात. ही जास्त नुकसान करणारी किड आहे. तुडतुडे व त्यांची पिल्ले ही झाडाच्या पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळया पडतात व नंतर झाड सुकून वाळते. शेतात ठिकठिकाणी किडग्रस्त भाताचे क्षेत्र गोलाकार करपलेले दिसते. यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. तुडतुडे तिरकस व भरभर चालतात. शेतात लांब पंखाचे भरपूर तुडतुडे खोडावर खालील बाजुस दिसून येतात. पांढºया तुडतुड्याचा प्रादुर्भाव तपकिरी तुडतुडयांच्या प्रादुर्भावाबरोबरच होतो. प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्यास चुडाचा बाहेरील पाने करपल्याने आढळतात.धानावरील तुडतुड्याचे व्यवस्थापनासाठी इमिडॅक्लोप्रिड १७.८ एस.एल. २.२ मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. २० मि.ली. किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यू जी २ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकरी २५० लिटर द्रावण वापरावे. गरजेनुसार १५ दिवसानी पुन्हा एकदा वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. एकाच किटकनाशकाची फवारणी न करता किटकनाशक बदलून फवारणी करावी.शेतात किटकनाशके फवारतांना सर्वसाधारणपणे पूढीलप्रमाणे काळजी घ्यावी. तीव्र द्रावण हातातळताना रबरी हातमोजे घालावेत. नाक व तोंडावर मास्क वापरावे. अ‍ॅप्रॉनचा वापर करावा. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे.उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. असे कृषि संशोधन केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकार, डॉ. जी.आर. शामकुवर व कनिष्ठ किटकतज्ज्ञ, डॉ.बि.एन. चौधरी यांनी कळविले आहे.