शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

धान खरेदीसाठी आता शेतकऱ्यांचे गुरुवारपासून धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:35 AM

गोंदिया : जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात १७ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतीने निवेदन देत धान खरेदी सुरू न ...

गोंदिया : जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात १७ मे रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतीने निवेदन देत धान खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि.२१) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंगळवारपर्यंत जिल्ह्यात सर्व केंद्र धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.२१) आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जिल्हा भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले. यावेळी त्यांंच्यासह भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे उपस्थित होते. निवेदनानुसार खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करून रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी सर्व हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. आजघडीला रब्बीच्या धानाची कापणी पूर्णत्वास आली आहे. तर खरिपाचा हंगामही डोक्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी शेतकर्‍यांच्या हातात दमडीही नाही. शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना पडक्या किमतीत आपले धान विकावे लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे मंगळवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील सर्व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास गुरुवारपासून (दि.२७) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यासोबतच शेतकर्‍यांच्या कर्जाच्या रकमेची दरवर्षी पूर्ण परतफेड केल्यावर देण्यात येणारे ५० हजार प्रोत्साहन अनुदान व शेतकर्‍यांना धानविक्रीवर दिला जाणारा ७०० रुपये बोनस त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.