लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कृषीपंप सुरु करताना विजेचा जबर धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.प्रदीप बंडूजी कुथे (३५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. कृषी पंपांना रात्रीच वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी सिंचन करण्यासाठी जातात. प्रदीप कुथे हा सोमवारी रात्री शेतात ओलीत करण्यासाठी गेला. वादळामुळे ट्रांसफार्मरमध्ये बिघाड झाला होता. तो दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात प्रदीपला विजेचा जबर धक्का लागला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषीत केले. प्रदीपच्या मागे पत्नी निराशा, दोन वर्षाची मुलगी असा आप्तपरिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराणकृषीपंपांना केवळ आठ तास आणि तेही रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने रात्री सिंचन करावे लागते. जंगली जनावरेही पाण्याच्या आशेने शेतात शिरतात. रात्रीच्या वेळी अपघात घडल्यास मदतही वेळेवर मिळत नाही. या सर्व प्रकाराला वीज वितरण कंपनी दोषी असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
बोथली येथे विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:58 PM
कृषीपंप सुरु करताना विजेचा जबर धक्का लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
ठळक मुद्देरात्रीचे ओलीत जीवावर बेतले