लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी किंवा शेतमजूर म्हटलं की, यात मालक-मजूर असा भेदभाव बघायला मिळते. मात्र, भंडारा शहरासह जिल्ह्याला ताजा भाजीपाला पुरवठा करणाºया बीटीबीत हा भेदभाव दूर सारून शेतकरी व येथील मजुरांच्या घामाचा सहृदय सत्कार करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमामुळे मालकासमोर जमीनीवर बसणाºया कष्टकºयांनाही योग्य सन्मान मिळाल्याने बघायला मिळाले.भंडारा शहरात अल्पावधीतच नावारूपास आलेल्या बीटीबीत हा सहृदय कार्यक्रम पार पडला. औचित्य होते, दिपावलीच्या लक्ष्मीपूजन व स्नेहमिलन कार्यक्रमाचे. दिवाळीच्या पर्वावर शेतकºयांना आमंत्रित करुन त्यांच्या सोबतीने लक्ष्मीपूजन तथा स्नेहमिलनाचा कार्यक्रम बीटीबी भाजी मंडीत हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक काशिनाथ तरकसे, बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे, सचिव पोर्णिमा बारापात्रे, जेष्ठ शेतकरी सुदाम वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रदिप दिवे, अजय भोंगाडे, मंगेश राऊ त, गौरीशंकर राऊ त, साजीर मामू, धनराज नागरीकर, भाऊ दास गायधने, राधा मंदुरकर, शशीकला भेदे, नैना राऊ त, निलिमा बारापात्रे, आशिष खेडीकर, घनश्याम खोब्रागडे, दिलीप बारापात्रे, खुशाल पराते आदी मंचावर उपस्थितीत होते.यावेळी बंडू बारापात्रे व पोर्णिमा बारापात्रे यांनी शेतकºयांना ‘हस्तादोलन’ करीत स्थानग्रहण करण्याची विनंती केली. पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतीषबाजी डोळयाचे पारणे फेडणारे ठरले. शेतकरीवर्गाने तर अतीआनंद घेत कार्यक्रमाची मौज लुटली. कार्यक्रमाला भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कधी नव्हे एवढा भव्य-दिव्य शेतकरी स्नेहमिलन सोहळा सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ठरला. या स्नेहमिलन सोहळयात शेतकºयांना मार्गदर्शनाकरीता विविध अंगातील फलके लावून कृषीज्ञान देण्याचा प्रयत्न कृषीतज्ज्ञ सुधिर धकाते यांनी केला. शेतकºयांच्या चर्चासत्रातून विविध पिके, रोग, किडी याची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक अतुल मानकर यांनी केले. संंचालन मुखरु बागडे यांनी केले. तर आभार प्रकाश भरके, सुदाम वंजारी यांनी मानले.शेतकºयांचा सत्कार सोहळावर्षभर भाजीपाला उत्पादक शेतकरी बापूजी मेहर चिखली, धनश्री वाघमारे, गजानन भुसारी, गोकुल राऊ त, भोजराम भेदे, रुपचंद चौधरी, अरुण पडोळे, घनश्याम भेदे, प्रमोकला बागडे, रिना बागडे, संगिता हटवार, विजय हटवार, सुदाम वंजारी, धनपाल बोपचे, पाडूरंग गांवडे, दादाराम घाटबांधे, मिनाक्षी बोपचे, मंदा घुबडे यासारख्या ५१ शेतकºयांचा सन्मानित करण्यात आले.शेतकºयांच्या सन्मानार्थ सजली संगीत मैफलदैनंदिन व्यस्त जीवनातून थोडी उसंत घेत बीटीबीत दाखल झालेल्या शेतकºयांला संगिताच्या दुनियेत नवा आयाम मिळाला. भक्तीगीत, भावगीत, फिल्मी गीत, लावणी, नृत्य यांची शानदार मेजवानी सादर करण्यात आली. ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर तर उपस्थित सर्वांचे पाय आपोआपच थिरकले.शेतकरी भावूकआयुष्यात केवळ श्रम आणि श्रमच उपसन इतरांना आनंद देणारा शेतकरी जेव्हा स्वत:चा सत्कार मान्यवरांच्या हाताने होतांना अक्षरश: भारावून गेला. हातात पुष्पगुच्छ, खाद्यावर शाल, आेंजळीत नारळ व सन्मानाचे चार शब्द कानावर पडताच आनंदाने डोळे भरून आले. बीटीबी चे आभार कसे मानावे, शब्दच सुचत नव्हते, केवळ डोळयात आंनदाश्रूच. आनंदाअश्रू ने डबडबलेले डोळे व मान नकळत हा हृदयस्पर्शी देखना सोहळा पाहणाºयांच्याही डोळयात अश्रू प्रवाहीत होत टाळयांच्या गजरात प्रत्येक शेतकºयांचा सन्मान केला गेला.
शेतकरी, मजुरांच्या घामाचा भाजी मंडीत सहृदय सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:55 PM
शेतकरी किंवा शेतमजूर म्हटलं की, यात मालक-मजूर असा भेदभाव बघायला मिळते. मात्र, भंडारा शहरासह जिल्ह्याला ताजा भाजीपाला पुरवठा करणाºया बीटीबीत हा भेदभाव दूर सारून.....
ठळक मुद्देबीटीबीचा स्तुत्य उपक्रम : मालक-मजूर भेदभावाला मिळाली नवी ओळख, हजारो शेतकºयांची उपस्थिती