शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शेतकऱ्यांना मार्गदर्शन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:40 PM

शेतशिवारात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला आणि कडधान्यावर वातावरणात वारंवार बदल होत असल्याने किडीचा वाढता प्रादुर्भाव आहे.

ठळक मुद्देकृषी अधीक्षक : बोरी येथे कृषी दिन उत्साहात

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : शेतशिवारात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला आणि कडधान्यावर वातावरणात वारंवार बदल होत असल्याने किडीचा वाढता प्रादुर्भाव आहे. किडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारची अवाढव्य औषधांची फवारणी करण्यात येत असल्याने विपरीत परिणाम शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. किडीपासून भाजीपाला व अन्य कडधान्याचे योग्य औषधांची फवारणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक के.बी. तरकसे यांनी केले.बोरी येथे कृषीदिन व किड नियंत्रण आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँक अर्थसहाय्यीत, कृषी विकास प्रकल्प आणि सर्वज्ञ विकास शेतकरी उत्पादक कंपनी मांडवी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन आणि कीड नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधीक्षक के.बी. तरकसे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ डॉ.एस.के. राखडे, डॉ.मोहोड, कृषी पणनतज्ज्ञ योगेश खिराडे, तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, विशाल पशिने, सरपंच अविनाश उपरीकार, उमरवाडाचे सरपंच नंदलाल गुर्वे, कोष्टीचे सरपंच अनुसया पंचबुद्धे, उपसरपंच अरविंद शिंदे, जैपाल विठुले उपस्थित होते. आयोजित कृषी दिन व कीड नियंत्रण सप्ताहाचे कार्यक्रमात कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी शेतकºयांनी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सल्ले आणि योग्य मार्गदर्शन शेतीविषयक संदर्भात घेत राहावे. या शिवाय शेत शिवारात विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. असे मार्गदर्शनात माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे विकासाकरिता शासनस्तरावर अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना थेट शेतकऱ्यांचे दारात पोहचली पाहिजे अशी माहिती कृषीतज्ज्ञांनी दिली.या कार्यक्रमात बोरी, उमरवाडा, कोष्टी, मांडवी, परतवाडा, रेंगेपार, पांजरा, तामसवाडी, सितेपार येथील शेतकरी सहभागी झाले. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक खंडाईत, विणा पडारे, भास्कर सोनवाने, मंगेश समरीत, वळवी, आर.आर. मलेवार, प्रमोद तितीरमारे, महेंद्र मेश्राम, जयप्रकाश मेश्राम, विजय मेश्राम, वर्षा मते, जितेंद्र मेश्राम, विरेंद्र मेश्राम यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नत्थूलाल शरणागत यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन महेंद्र मेश्राम यांनी केले.