ऑनलाईन लोकमतसाकोली : विद्यापीठ निर्मित भाताचे वाण, भात पिकापासून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तंत्रज्ञान यामध्ये बियाण्यावरील खर्च कमी करणे, रोग व कीड प्रतिकारक वाणाचा वापर, बीजप्रक्रिया पद्धत, पट्टा पद्धतीचा अवलंब, भात पिकाच्या तणसाचा तसेच जिवाणू संवर्धन व सेंद्रीय खताचा वापर आणि भातापासून मुल्यवर्धनासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून आर्थिक उन्नती शेतकºयांनी साधावी, असे प्रतिपादन वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी.आर. शामकुवर, यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि संशोधन केंद्र साकोलीतर्फे भाभा परमाणू अनुसंधान केंद्र ट्रॉम्बे मुंबई पुरस्कृत वाण गुणक व विस्तार प्रकल्पाअंतर्गत कृषि संशोधन केंद्र, साकोली येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय कृषि अधिकारी पी.पी. गिदमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी.व्ही. शेंडे होते. यावेळी कृषि भूषण शेतकरी शेषराव निखाडे व रामचंद्र कापगते यांनी शेतीवर विकास व आर्थिक विकास करण्याकरिता विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान वापरावे तसेच कृषि संवादिनीचा अभ्यास करून शेती करावी असे सुचविले. प्रगतशिल शेतकरी मधुसुदन दोनोडे यांनी शेतकºयांची समस्या अडचणी विषयी तसेच पाऊसमान कमी होत असल्याने रासायनिक खतामुळे शेती निष्फळ झाल्याचे सांगितले. त्याकरिता शेतकºयांनी नियोजनबद्ध शेती करावी व त्यासोबत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तरच शेतकºयांचा विकास होऊ शकतो. शेतीमध्ये गोमुत्र, जिवामृत्राचा वापर करावा तसेच विविध पिकाचा अवलंब करून उन्नती करावी तसेच फळबाग योजनेमध्ये केळी पिकाची लागवड करावी असे सांगितले.तालुका कृषि अधिकारी जे.पी. चौधरी, यांनी कृषि विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावे तसेच नवीन सुधारित, संकरीत वाणवा वापर करून उत्पादन खर्च कमी करूनशेती हा व्यवसाय म्हणून पाहावे तसेच शेतकºयांनी आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करावी जेणे करून खत व्यवस्थापन योग्य करता येईल, असे सांगितले.मेळाव्यामध्ये शेतकºयांनी कृषी प्रदर्शनीचा लाभ घेतला. त्यामध्ये कृषि संशोधन केंद्र साकोली व सिंदेवाही येथून प्रसारित झालेल्या सर्व धानाचे वाण तसेच सुंगंधीत वाणाचा लोंब्या आर्कषण ठरले.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:35 AM
विद्यापीठ निर्मित भाताचे वाण, भात पिकापासून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तंत्रज्ञान यामध्ये बियाण्यावरील खर्च कमी करणे, रोग व कीड प्रतिकारक वाणाचा वापर, .....
ठळक मुद्देसाकोलीत शेतकरी मेळावा,चर्चासत्र : वरिष्ठ भात पैदासकारांचे प्रतिपादन