गत दोन वर्षांपासून देशात व राज्यात कोरोना संकट उद्भवल्याने या आजाराच्या प्रतिबंधासाठी शासन प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोळा सणादरम्यान कोरोना आजाराचे संक्रमण होऊ नये, यासाठी नुकतेच जिल्हा प्रशासनाने हा सण साजरा करण्यावर बंदी घातली आहे. तथापि, ग्रामीण भागात शेतकरी जनतेने शासन निर्देशांचे अनुपालनात विविध झडत्या म्हणून हर बोला हर हर महादेवच्या गजरात पोळा सण साजरा केला.
यावेळी काही शेतकऱ्यांनी "पोळा रे पोळा बैलाचा पोळा, शेतकऱ्यांच्या पिकावर व्यापाऱ्याचा डोळा, व्यापाराच्या नफ्यावर सरकारचा डोळा, सरकारच्या पैशावर मंत्र्यांचा डोळा, मंत्र्यांच्या पैशावर ईडीचा डोळा, एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव..." आदी झडत्या म्हणत राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला.
दरम्यान, मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा शेतकऱ्यांचा पोळा सण गत दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे साधेपणात साजरा केला जात असताना ग्रामीण भागातही शांतता व सुव्यवस्था कायम असल्याचे दिसून आले. तालुका प्रशासनाअंतर्गत लाखांदूर पोलिसांनी शासन निर्णयाचे उल्लंघन टाळता यावे, यासाठी नुकतेच पथसंचलन करून नागरिकांत जनजागृती केली होती. या जनजागृतीनुसार ग्रामीण भागातदेखील शासन निर्णयाच्या पालनात कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पोळा सण साजरा करण्यात आला.
060921\img20210906160526.jpg
कुडेगाव येथील पोळा सण साजरा करतांना शेतकरी