लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील शेतशिवारात असणारे पांदन रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतशिवारात पांदन रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र यापांदन रस्त्यावर गत पाच वर्षांपासून मुरुम टाकण्यात न आल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.मागील शासनाच्या कार्यकाळात रोहयोची कामे परिसरात झाली होती. मात्र त्यानंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्याने रोहयोची कामे अर्धवट राहिली आहे. शासनाच्या निधीअभावी पांदन रस्त्यावर मुरुमाचा थर टाकण्यात आला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होताच राज्यात कुशल कामाची थकीत राहील आहे.शासनाने पुन्हा एकदा रोहयो योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कंत्राटदारासह यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पांदन रस्त्यांना मुरुम आणि खडीकरणासाठी वेळेत निधी प्राप्त झाला असता तर शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चांदपूर गावापासून मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे. या रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने शेतकऱ्यांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे.मोठ्या प्रमाणात निधीची गरजअनेकदा वाहने रस्त्यातच अडकून पडत असल्याने खरीपाच्या कामात व्यत्यय येत आहे. शिवाय पायी जातांना देखील शेतकऱ्यांसह महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने पांदन रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे. पांदन रस्त्यांची कामे झाली असली तरीही त्यावर मुरुमाचा थर टाकला नसल्याने णेन हंगामात शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे चांदपूर ते मांगली नहर फाट्यापर्यंत जाणारा पांदन रस्ता दुर्लक्षीत झाला आहे.चांदपूर मांगली शेतशिवारातील पांदन रस्त्याचे खडीकरण आवश्यक असून शेतकºयांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा.- हेमराज लांजे,माजी सरपंच चांदपूर
चिखलमय पांदन रस्त्यांमुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 5:00 AM
शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
ठळक मुद्देरस्त्यावर चालणे झाले कठीण : सिहोरा परिसरातील प्रकार, ऐन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय