शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: November 03, 2016 12:39 AM

तालुक्यातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.

किन्ही येथील घटना : चार लाख रूपयांचे होते कर्जलाखांदूर : तालुक्यातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथे घडली. दिलीप मारोती चिरवतकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथील दिलीप चिरवतकर या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती असून दरवर्षी सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने दिलीपवर कर्जाची रक्कम वाढली होती. मागील काही वषार्पासून बँक, बचतगट आणि खासगी सावकाराकडून चार लाख रूपयाच्या वर कर्ज आहे. कर्ज काढून शेती केली मात्र नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे ते नेहमी तणावात राहत होते. मंगळवारला दुपारी सरांडी (बुज) रस्त्यावरील आपल्या शेतात जावून शेतातील धान पिकाची अवस्था बघून ते अधिकच हतबल झाले. दरम्यान, शेतात असलेल्या किटकनाशक प्राशन केल्याने ते जागेवरच पडून राहिले. ही घटना शेताजवळील चिरवतकर यांच्या शेताला लागून असलेल्या ईश्वर शहारे यांच्या लक्षात आल्यानंतर शहारेनी गावातील विनायक तरारे यांना दिलीप शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच चिरवतकर कुटुंबियांनी लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. भंडारा येथून नागपूरला नेण्यात आले. नागपुरात उपचारादरम्यान बुधवारला दुपारी दिलीपचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)