शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

शेतकरी कर्जमुक्तीच्या पाशात अडकणार सावकार

By admin | Published: June 07, 2015 12:45 AM

शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या कर्जाची कर्जमुक्ती योजना प्रथमच शासनाने जाहीर केली.

बोगस पावत्या : शेतकरी कर्जमुक्तीला मुकण्याची भीतीअर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या कर्जाची कर्जमुक्ती योजना प्रथमच शासनाने जाहीर केली. मात्र सावकार हे घेतलेल्या कर्जाची नमुन्यातील पावती शेतकऱ्यांना देत नाही. शेतकऱ्यांजवळ पावती नसल्यामुळे ते कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. अशी कर्जमुक्ती पहिल्यांदाच झाल्याने सावकार सुद्धा अडचणीत आले आहेत.शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय १० एप्रिल रोजी घेतला. या निर्णयानुसार नोंदणीकृत सावकराकडून घेतलेल्या कर्जाची संपुर्ण रक्कम शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे १७१.३० कोटी रुपयांचे कर्ज शासनाकडून सावकरांना अदा केले जाणार आहे.आजतागायत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रकरणे ही महसूल विभागामार्फत निकाली काढली जात होती. प्रथमच शासनाने नोंदणीकृत सावकराकडून घेतलेल्या कर्जाला माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला वस्तू, मालमत्ता तारण ठेऊन सावकार कर्ज देतात. नुसत्या सातबाराच्या उताऱ्यावर कर्ज दिले जात नाही. त्यामुळे ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी म्हणायची हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे खरे कर्जस्थान हे बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था हे असतात. परंतु सावकराकडून घेतलेल्या कर्जधारकाजवळ जर सातबारा असेल तर ती शेतकरी कर्जमाफी ठरत आहे. बहूतांशी व्यक्ती हे इतर कारणांसाठी (शेतीसाठी नव्हे) सावकाराकडून कर्ज घेतात.ग्रामीण भागात बहूतांश नोंदणीकृत सावकार हे विना नमुन्यातील पावती अथवा साधी चिठ्ठी देऊन वस्तु तारण करुनच कर्ज देतात. याची अधिकृत नोंदणी सावकरांच्या दस्तावेजात नसते. प्रत्येक नोंदणीकृत सावकराच्या दस्तावेज व रोकडवहीचे लेखा परीक्षण हे ३१ मार्च पर्यंत केले जाते. यावर्षी शासनाने ही योजना एप्रिल महिन्यात म्हणजेच सावकारांचे लेखा परिक्षण झाल्यानंतर जाहीर केली. त्यामुळे नमुण्यातील पावती फाडण्यात आली नसल्याने त्याची दस्तावेजात नोंद नाही. कर्जमाफीच्या परिपत्रकातील परिच्छेद २ मधील अट ५ मध्ये सावरकारांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जासंबंधी विहित अभिलेख्यांचे लेखापरिक्षण करुन कर्जमाफीच्या रकमेची निश्चिती करावी असे नमूद आहे. आणि सावकारांनी नमुन्यातील पावत्या फाडलेल्या नसल्याने त्यांच्या अभिलेख्यातील नोंदी आढळत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची फसगत होणार आहे. अनेक शेतकऱ्यांजवळ मूळ नमुन्यातील पावती नसल्याने त्यांची ओरड सुरु आहे. तर यात अडकल्या जाण्याच्या भीतीने सावकार धास्तावले आहेत.शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. १ मधील अट क्र.३ ही अन्यायकारक असल्याची ओरड सुरु आहे. यात परवानाधारक सावकराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र असणार नाही, असे म्हटले आहे. परंतु तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली गावे ही दुसऱ्या जिल्हा अथवा तालुक्यापासून अगदी जवळ असतात. अशा लोकांचा व्यवहार हा त्या निकटच्या तालुक्याशी असतो. काही प्रसंगी कामानिमित्ताने वास्तव्य दुसऱ्या तालुक्यात तर शेती दुसरीकडेच असते. अशा अनेक लोकांनी जिथे वास्तव्य आहे तेथेच कर्ज घेतले आहे. तर काहिंनी अगदी नजीकच्या दुसऱ्या तालुक्यातील सावकाराकडून कर्ज घेतले आहे, अशी अनेक लोक या कर्जमुक्ती योजनेतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)