भाजीपाल्याचे दर एकदमच कमी झाल्याने शेतकरी वर्ग संकटात आलेला आहे. वाढत्या मजुरीच्या व बियाणांच्या दरांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना अजिबातच परवडण्याजोगे नाही. वांगे १०रुपये किलो, मिरची २० रुपये, टमाटर १२ते १५ , सांबार १० ते १५ , मेथी १०ते १५, पालक दहा ते पंधरा, चवळी भाजी पंधरा ते वीस, पाल्याचे कांदे 20 ते 30, फुल कोबी दहा ते पंधरा, पत्ता गोबी दहा रुपये बारा रुपये, असा पालांदूर येथील आठवडी बाजारातील भाजीपाल्यांचा दर शनिवार ला अनुभवयास मिळाला. या दरात शेतकरी वर्गाला मजुरी ,बियाणे, औषधी, खते यांच खर्च वजा जाता खिशात एक ही रुपया राहण्याची शक्यता दिसत नाही.
तर दुसरीकडे चार महिने कोरोना काळात वाढलेल्या भाजीपाल्याने जनसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र भंडारा जिल्ह्यातील स्वतःच्या शेतीतील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने स्थानीक भाजीपाल्यांचे दर निश्चितच कमी झाल्याने गृहिणींचे बजेट सावरलेले आहे. महिन्याकाठी लागणारा भाजीपाल्याचा बजेट अर्ध्यावर आल्याने महिला वर्गांना हायसे असे वाटत आहे.
पुढे आणखी काही महिन्यापर्यंत भाजीपाल्यांचे दर पडण्याची दाट शक्यता आहे. मागणी व पुरवठा चा आलेख बघता पुरवठा अधिक असून मागणी कायम राहत असल्याने भाजीपाल्याचे दर पुढील दोन महिने अत्यल्पच राहतील असा अंदाज आहे.
कोट
७० डिसमिल शेतीत सांभाराची लागवड केलेली आहे. पेरणीच्या पूर्वी बाजारात सांभाराला अर्थात धनियाला चांगला दर होता. परंतु आमचा भाजीपाला विक्री ला आला आणि भाव पडले. दहा रुपये किलो धनीया काढणीला सुद्धा परवडणे नाही.
टिकाराम भुसारी, भाजी उत्पादक शेतकरी, पालांदूर.