चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात धान हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी केली, त्यांना त्यांचे धानाची चुकारे मिळाले. पण सध्याच्या सरकारने बोनस देण्यास खूप वेळ लावला. यापूर्वी शेतकऱ्यांना अर्धा बोनस मिळालेला आहे, पण अजून अर्धा बोनस शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न पडला आहे. शेती करण्यासाठी बियाणे, औषधी व मजुरी खर्च प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बँक सोसायटी यांच्याकडून काढलेले कर्ज देखील शेती करण्यास कमी पडत आहे. मागील खरीप हंगामातील बोनसचे अर्धे पैसे मिळाले. पण अर्धे पैसे अजूनपर्यंत खात्यात जमा झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने चौरास भागातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील बोनसचे अर्धे पैसे त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची मागणी चौरास भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
धानाचे बोनस न मिळाल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:40 AM