मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कोरोनाच्या वाढत्या संकटाने संपूर्ण मानवजातीला संकटात आणले आहे. अशाच एका नव्या संकटात शेतकरी सुद्धा सापडला असून निसव्या नंतर लोंबी पांढरी होत असल्याने चिंता वाढलेली आहे.ही समस्या तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे व वरिष्ठ भात पैदासकार डॉ.जी.आर. श्यामकुवर यांना कळविण्यात आले. तत्परतेने त्यांनी लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात चुलबंद खोऱ्यामध्ये शिवार फेरी घालत शेतकऱ्यांना दिलासा दिला. पालांदूर येथील टिकाराम भुसारी, सदाराम हटवार, बळीराम बागडे, कृष्णा पराते, भास्कर जांभूळकर, रामचंद्र देशमुख, अरुण पडोळे, आदींच्या शेतात धानाच्या लोंबी शेतकऱ्याच्या समक्षच सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यास करून त्यातील असलेले रोग व किडीचा अभ्यास देत उचित फवारणीसाठी शेतकऱ्याना शहाणे केले.पºहे भरणे पासून ते रोहिणी व नंतरचे धानाचे संगोपन कसे करायचे या विषयांमध्ये सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्याना करण्यात आले. खताच्या मात्रा, कीड व रोगाचे अनुषंगाने फवारणीचे मार्गदर्शन यावेळी विस्तृततेने शेतकºयांचा अभ्यास घेत थेट शेतावरच शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.शेतकऱ्यानीही अधिकाऱ्याना त्यांच्या अनुभवातील आलेल्या विविध प्रश्न मांडून त्यांची उकल करून घेत स्वत:च्या ज्ञानात भर पाडून घेतली. यापूर्वी धान पिकावर हिरवा स्टिंग/स्टींक बग नुकसानदायक स्थितीत बघायला मिळालेला नाही मात्र या वर्षीपासून काही शेतात या किडीने धान पिकाला नुकसान पोहोचविले आहे अभ्यासांती पिकावर रोग व किडीचे प्रादूर्भाव अनुभवास मिळाले. शेतकऱ्यानी निदान २०० लिटर द्रावणाची फवारणी एका एकरात करणे गरजेचे आहे . तसेच दुपारी तीन ते सायंकाळी सात पर्यंत कमी उन्हात फवारणी करण्याचे नियोजन करावे.-पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनीधान पिकावर पर्ण कोष करपा, मानमोडी, खोडकिडी यांचा प्रादुर्भाव आढळला. शेतकºयांनी घाबरून न जाता वेळीच फवारणी केली तर रोग व किडी निश्चितच बरी होईल यात शंका नाही. फवारणी मध्ये शिफारशीनुसार बुरशीनाशक, कीडनाशक विशिष्ट प्रमाणात फवारणी करणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी धान दोरीत लागवड करून व पट्टा पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. हिरवा स्टिंग/स्टिंक बग यावर्षी प्रथम च नुकसानग्रस्त स्थितीत आढळला.-डॉ.जी.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार कृषी संशोधन केंद्र साकोली.
उन्हाळी धान पिकावर अज्ञात रोगाच्या सावटाने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात चुलबंद खोऱ्यामध्ये शिवार फेरी घालत शेतकऱ्यांना दिलासा दिला. पालांदूर येथील टिकाराम भुसारी, सदाराम हटवार, बळीराम बागडे, कृष्णा पराते, भास्कर जांभूळकर, रामचंद्र देशमुख, अरुण पडोळे, आदींच्या शेतात धानाच्या लोंबी शेतकऱ्याच्या समक्षच सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यास करून त्यातील असलेले रोग व किडीचा अभ्यास देत उचित फवारणीसाठी शेतकऱ्याना शहाणे केले.
ठळक मुद्देपांढऱ्या लोंबीत वाढ : कृषी अधिकारी व भात पैदासकार यांची संयुक्त शिवारफेरी