प्रकरण रोहयो मजुरीचे : प्रशासनाची बेदखलसाकोली : पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथे सहा महिन्यापुर्वी करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावरील ४५० मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. ही मजुरी तात्काळ देण्यात यावी, यासाठी भारतीय कम्युनिष्ठ पक्षातर्फे शांताराम शेंडे, महेश राऊत, महादेव गजबे व भजनदास मानकर यांनी बुधवारपासून बोदरा येथे आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असूनही प्रशासनाने याची साधी दखलही घेतली नाही.महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत बोदरा अंतर्गत पांदन रस्ता, बोळी खोलीकरण व तलावाची गाळ काढणे ही कामे करण्यात आली या कामावर गावातील जवळपास ६५० मजुर कामावर होते. यापैकी काही मजुरांची मजुरी देण्यात आली व उर्वरित ४५० मजुरांची मजुरी मागील सहा महिन्यापासून देण्यातच आली नाही. परिणामी या मजुरावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे शासनाने या मजुरांची मजुरी तात्काळ देण्यात यावी. वर्ष २०१३-१४ मध्ये मंजुर झालेले घरकुलापैकी बाकी असलेल्या घरकुलाचे काम त्वरीत करण्यात योव, बीपीएल यादीमध्ये गरजुंची नावे टाकण्यात येवून एपीएल धारकांना राशन कार्ड देण्यात यावे, अशी मागणी उपोषण कर्त्याची आहे. यासंदर्भात प्रशासनाला यापुर्वीही लेखी सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा फायदा नाही. परिणामी कालपासून हे उपोषण सुरू असून या उपोषणाला ४५० मजुरांनीही पाठींबा दर्शविला असून तेही या उपोषणात सामिल आहेत. जोपर्यंत मागण्या मंजुर होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलन कर्त्याानी घेतली आहे. या उपोषण मंडपाला खंडविकास अधिकारी, डॉ. शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी भेट दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बोदरावासीयांचे उपोषण सुरू
By admin | Published: October 09, 2015 1:15 AM