लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात नामांकित असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या मानव मंदिर समोरील परिसरात सुरू असलेल्या ‘पेवर ब्लॉक’च्या बांधकामात अनियमितता आढळून आल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला सुदेश वैद्य यांनी शनिवारला दुपारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.रात्री उशिरापर्यंत या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने उपोषण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणेशपूर येथील गांधी वॉर्डात सदर बांधकाम ३ आॅक्टोबर पासून सुरु आहे. ३ लाख २८ हजार रुपयांचे हे बांधकाम आहे. या बांधकामाच्या पाहणीदरम्यान 'प्लॅन इस्टीमेट'नुसार काम दिसून आले नाही. या संदर्भात इंजिनियर महाकाळकर यांना बांधकामाविषयी माहिती जाणून घेतली असता निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले.अनियमितता संदर्भात ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसमक्ष पाहणी केली असता बांधकामात अनियमितता असल्याचा आरोप वैद्य यांनी केला. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी काम बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र झालेल्या कामाची योग्य चौकशी करून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला वैद्य यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे.उपोषण सुरु झाल्यानंतर आज दिवसभरात विस्तार अधिकारी हुमणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रेम वनवे, माजी सभापती राजकपूर राऊत, पंचायत समिती सभापती पवन कोराम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा केली. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. उपोषण मागे घ्यावे, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी रात्रीउशिरापर्यत प्रयत्न केले. परंतु प्रयत्नांना यश आले नाही.रत्नमाला वैद्य यांच्या उपोषणाला उपसरपंच धनराज मेहर, सदस्य चितेश मेहर, शेखर खराबे, सिद्धार्थ भोवते, रोशणी थोटे, जया मेहर, ललीता कांबळे, माधुरी देशकर व गांधी वॉर्डातील नागरिकांनी पाठींबा दिला आहे.बांधकामाला केवळ दोनच दिवस झाले आहेत. तांत्रिक अधिकाºयांच्या देखरेखीत बांधकाम सुरु आहे. कामाचे देयकही वितरीत करण्यात आले नाही. त्यामुळे कामात अनियमितता म्हणणे योग्य नाही.- श्याम बिलवणे,ग्रामविस्तार अधिकारी, गणेशपूर
गणेशपूर ग्रा.पं.समोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:18 PM
जिल्ह्यात नामांकित असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या मानव मंदिर समोरील परिसरात सुरू असलेल्या ‘पेवर ब्लॉक’च्या बांधकामात अनियमितता आढळून आल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला सुदेश वैद्य यांनी शनिवारला दुपारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
ठळक मुद्देबांधकामात अनियमितता : उपोषणकर्त्या सदस्याला उपसरपंचासह ग्रामस्थांचा पाठिंबा