आॅनलाईन लोकमतभंडारा : आंभोरा (भातहांडी) येथे ये-जा करण्यासाठी डोंग्याचा वापर करावा लागतो. येथील वैनगंगा नदीच्या पात्रावर अनेक वर्षांपासून डोंगा घाट सुरु आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या डोंगा घाटाचा लिलाव झालेला नाही. परिणामी नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या मार्गावर सध्या सुरू असलेली प्रवासी वाहतूक ही अवैधरित्या सुरु असल्याचा आरोप होऊ लागला आहे.मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत या डोंगा घाटाचा लिलाव करण्यात आलेला नाही. याठिकाणी पूर्वीचेच कंत्राटदारांकडून परवानगीविना डोंग्यातून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रेमानंद नखाते यांनी अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.परंतु या डोंगाघाटात स्थानिक नेते असल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कोणती कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही नखाते यांनी केला आहे.भंडारा जिल्हा परिषदेकडून मौदी येथील डोंगा घाटाचा लिलाव करण्यात येत होता.जून २०१७ मध्ये या लिलावाची मुदत संपली. त्यानंतर या घाटाचे लिलाव करण्याची गरज होती परंतु ती करण्यात आली नाही. या नदीमार्गाने नागरिक ये-जा करीत असून डोंगा घाटाचा लिलाव न झाल्यामुळे या घाटावरील डोंग्याचा ताबा भंडारा पंचायत समितीने स्वत:कडे घेतला.त्यानंतर मासेमारी करण्याच्या लहान बोटीने नागरिक प्रवास करू लागले. याची माहिती पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देऊनही या घाटावरून ये जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे वैनगंगा ढिवर पुरुष बचतगटाने अटी व शर्तीच्या अधिन राहून हा डोंगा घाट या बचत गटाला द्यावा अशी मागणी केली होती. परंतु या बचतगटाला हे काम देण्यात आले नसल्याचा आरोप वैनगंगा ढिवर पुरुष बचतगटाने केला आहे.
आंभोरा डोंगा घाटातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:56 PM
आंभोरा (भातहांडी) येथे ये-जा करण्यासाठी डोंग्याचा वापर करावा लागतो. येथील वैनगंगा नदीच्या पात्रावर अनेक वर्षांपासून डोंगा घाट सुरु आहे.
ठळक मुद्देअवैध प्रवासी वाहतूक सुरूच : डोंगा घाटाचा लिलाव करण्याची मासेमार बांधवांची मागणी