लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शौचालय बांधकामादरम्यान घडलेल्या वादात जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना भंडारा न्यायालयाने बापलेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. फुलचंद बळवंत आगाशे व ज्ञानेश्वर फुलचंद आगाशे दोन्ही रा. कर्कापूर (ता.तुमसर) अशी शिक्षा ठोठावलेल्या बापलेकांची नावे आहेत. हा निकाल शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी दिला.माहितीनुसार, २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळच्या सुमारास शौचालय बांधकामाच्या वादातून फुलचंद व ज्ञानेश्वर आगाशे यांनी लोखंडी फावडा व लाकडी दांडा घेऊन शेजारी राहणाऱ्या गोपीचंद आगाशे, त्यांची पत्नी यांच्यावर वार केले. यात अजय गोपीचंद आगाशे बाजूला होण्याच्या प्रयत्नात त्यालाही मार बसला. तसेच त्याची आई, वडील व भाऊ यांनाही फुलचंद व ज्ञानेश्वर आगाशे यांनी मारहाण केली.तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी दोघांवर भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी तपास करून दुसऱ्या दिवशी दोघा बापलेकाला अटक केली. सदर प्रकरणी भंडारा येथील सत्र न्यायालयात प्रकरण न्यायप्रवीष्ट करण्यात आले.साक्ष पुरावा व अन्य कारवाईच्या मदतीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी फुलचंद व ज्ञानेश्वर आगाशे याला दोषी ठरवीत भादंविच्या ३०७ कलमान्वये प्रत्येकी पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच १० हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.दुर्गा तलमले यांनी युक्तीवाद केला.सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद बानबले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सहादेव बिनझाडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
बाप-लेकाला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 9:48 PM
शौचालय बांधकामादरम्यान घडलेल्या वादात जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना भंडारा न्यायालयाने बापलेकाला पाच वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. फुलचंद बळवंत आगाशे व ज्ञानेश्वर फुलचंद आगाशे दोन्ही रा. कर्कापूर (ता.तुमसर) अशी शिक्षा ठोठावलेल्या बापलेकांची नावे आहेत. हा निकाल शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी दिला.
ठळक मुद्देखुनाचा प्रयत्न : कर्कापूर येथील घटना, भंडारा न्यायालयाचा निकाल