ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पऱहे पिवळे पडत असून रोवणी झालेल्या शेताला तडे पडले आहेत. अपुऱ्या पावसाने भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार १८७ हेक्टरवर भात पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा अपुºया पावसामुळे १५ जुलैपर्यंत केवळ ३१ हजार ६९१ हेक्टरवर म्हणजे ४ टक्केच रोवणी आटोपली आहे. भाताचा पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना निराश केले. मध्यंतरी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पऱहे टाकले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेवर रोवणी केली. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यात सारखी उन तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱहे पिवळे पडत आहे. पऱहे वाचविण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व इतर साधनाने पाणी देत आहे. रोवणी झालेल्या शेतांना तडे पडले आहेत.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र असून आतापर्यंत ७ हजार २७५ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरपैकी ४ हजार ४४० हेक्टरवर रोवणी झाली तर चंद्रपूर जिल्ह्यात ५ हजार ८९८ हेक्टर, गडचिरोली १३ हजार ८५१ आणि नागपूर जिल्ह्यात २२७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. पर्वू विदर्भात केवळ ४ टक्के रोवणी झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आपल्या शेतात टाकलेले पऱहे पिवळे पडत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास संपूर्ण भात पट्टा दुष्काळाच्या छायेत येण्याची भीती आहे. हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरत असून दररोज उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.बॉक्सनदी-नाले कोरडेचअपुºया पावसाने नदी-नाल्यांना अद्यापही पुर गेला नाही. भंडारा जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगेचे पात्र अद्यापही कोरडे आहे. इतर नद्यांचीही अशीच अवस्था आहे. सिंचन प्रकल्पही तळाला लागले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही कायम आहे.
पूर्व विदर्भातील ३१ हजार हेक्टरवरील रोवणी उलटण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:36 PM
पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देभात उत्पादक दुष्काळाच्या उंबरठ्यावरपावसाचा दीर्घ खंड