लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते. त्यामुळे भुतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचे आवाहन मनिष गोस्वामी यांनी केले.भंडारा जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी मन परिवर्तनाचा कार्यक्रम शनिवारला घेण्यात आला. यावेळी सभेला ३५० कैद्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी येथील युनिव्हर्सल हायस्कूलच्या प्राचार्या एम.एस. साईजन होत्या. यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक अमृत आगाशे, पोलीस उपनिरीक्षक आर.डी. मेगडे, क्षीरसागर, राजेश निशाद आदी उपस्थित होते.गोस्वामी म्हणाले, कैदी हा जन्मत: गुन्हेगार नाही. परंतु त्यांनी जो गुन्हा केला तो गुन्हा कबूल करा, खरा पश्चाताप करा, यापुढे गुन्हा न करण्याचा निर्णय घ्या, वाईट संगतीमुळे व दारूच्या व्यसनामुळे अधिकाअधिक गुन्हे घडतात. अतुट निर्णय घेवून वाईट काम टाळण्यासाठी स्वत:चे मनपरिवर्तन करा, असे आवाहन केले.प्राचार्य एम.एस. साईजन म्हणाल्या, मागील केलेले हे कृत्य वाईट होते. त्याला अपघात समजून जीवन येथे संपला असे नाही. कारागृह म्हणजे 'रिपेरिंग सेंटर' आहे. चुका दुरूस्त करून आदर्श बनायचे आहे. कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती येवू शकते. त्यामुळे आतापासून मन परिवर्तन करणे काळाची गरजेचे आहे.याप्रसंगी अतिथींच्या हस्ते कैद्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कैद्यांनी आपल्या व्यथा उपस्थित अतिथींजवळ व्यक्त करून ढसाढसा रडू लागले.
भूतकाळातील घटना विसरून भविष्याचा विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:12 PM
कळत नकळत गुन्हा घडला की मानवाच्या जीवनाला एक कलंक लागतो. ते आयुष्यभरासाठी असते. बंदुकीतून सुटलेली गोळी व घडलेला गुन्हा यातून जीवनाचा मार्ग बदलवू शकत नाही, असे असले तरी कैद्यांना उर्वरित आयुष्य समाजाच्या हितासाठी जगल्यास अनेकांना त्यांच्यावर लागलेले कलंक पुसून काढता येते.
ठळक मुद्देमनीष गोस्वामी : जिल्हा कारागृहात मन परिवर्तन सभा, ३५० बंदींची उपस्थिती