मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिके पिकवून शेतीत आमुलाग्र बदल अपेक्षित असणारे शेतकरी दुर्मिळच. अशाच दुर्मीळतेत ४० एकरात विविध पिके लावून कमी पाण्यात उत्कृष्ट गहू पिकविण्याचा मान लाखनी तालुक्यातील वाकलचे सुखराम मेश्राम यांना मिळाला आहे. कृषमित्र, कृषी पदवीधर प्रशांत जांभुळकर, ज्येष्ठ शेतकरी दामाजी खंडाईत, कृषीतज्ज्ञ यशवंत गौरे, देवी पटले यांनी त्यांना थेट त्यांच्याच बांधावर जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छाने सन्मानित केले. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.चुलबंद खोऱ्यात पाण्याची मुबलकता असली तरी एप्रिल, मे महिन्यात भूजल पातळी संकटात असते. त्यामुळे पाणी पातळी अभ्यासून धानाऐवजी कमी पाण्याची पिके घेतली जातात. सुखराम मेश्राम यांनी गहू, हरभरा, पोपट, धान, तुर आदी पिके निवडत संपूर्ण शेती उत्पादीत केली. कोणत्याच पिकाचे प्राथमिक टप्प्यातले ज्ञान सुखरामजी यांना आहे. नियमितपणे कृषी कार्यालयाशी संपर्कात राहून अधिक ज्ञान जोपासण्याची जिज्ञासा कायमस्वरुपी त्यांच्यात असल्याने इतर शेतकरी त्यांचा आदर्श जोपासतात. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड निर्माण करून बेरोजगारीला बाजूला करीत स्वत: रोजगार निर्माते झाले. दैनंदिन १०-१५ मजुरांना काम मिळाले आहे. पत्नी कुसुमबाई त्यांना सहकार्य करीत असून मजूरवर्गांच्या सोबतीने त्याही स्वत: सहकार्य करतात. मेश्राम यांनी चार एकरात गहू पिकविला असून केदार (अंकुर) जातीचा आहे. एका एकरात १३-१५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा दिसत आहे. नजरेत थेट घर करणारा गहू चालत्या माणसाला थांबून निरीक्षण करायला भाग पाडणारा गहू शेतकऱ्यांचा चर्चेचा विषय आहे. आठ एकरात हरभरा, पाच एकरात धान, चार एकरात लाखोरी, तीन एकरात उडीद व इतर पिके उत्पादित करीत आहेत.काहीतरी वेगळे करण्याच्या सवयीने सुखराम मेश्राम प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले. पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून अभ्यासून इतरांना अभ्यास देत नव्या ज्ञानाची भर घालण्याची किमया त्यांच्या गहू पिकात आढळले. त्यांचा आदर्श इतरही शेतकºयांना आपसुकच मिळतो.- प्रशांत जांभूळकर, कृषी पदवीधर, कृषीतज्ज्ञ, पालांदूर (चौ.)
प्रगतशील शेतकऱ्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 9:27 PM
एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिके पिकवून शेतीत आमुलाग्र बदल अपेक्षित असणारे शेतकरी दुर्मिळच. अशाच दुर्मीळतेत ४० एकरात विविध पिके लावून कमी पाण्यात उत्कृष्ट गहू पिकविण्याचा मान लाखनी तालुक्यातील वाकलचे सुखराम मेश्राम यांना मिळाला आहे.
ठळक मुद्देवाकल येथील कार्यक्रम : एकरी १५ क्विंटलचे गहू उत्पादन