भंडारा : जागेच्या वादावरून दाेन कुटुंबात हाणामारी हाेण्याची घटना साकाेली तालुक्यातील सासरा येथे बुधवारी घडली. यात दाेन्ही कुटुंबांतील व्यक्ती जखमी झाल्या असून परस्परविराेधी तक्रारीवरून चाैघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजू शरद चांदेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आराेपी चेतन यशवंत घनफाेडे आणि रामकृष्ण यशवंत घनफाेडे या दाेघांनी त्यांच्या पतीसाेबत वाद घातला. वादात मध्यस्थी करण्यासाठी रंजू गेली असता तिला शिवीगाळ करून बांबूच्या काठीने मारहाण केली. तसेच पती, मुलगा आणि सासूलाही लाेटलाट केली. यावरून पाेलिसांनी चेतन व रामकृष्णविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात चेतन घनफाेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद चांदेवार, रंजू शरद चांदेवार या दाेघांनी शिवीगाळ करून हातातील काठीने चेतनच्या भावाच्या डाेक्याला मारहाण केली. त्यावरून शरद व रंजूविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.