तहसीलदारांना निवेदन : आदिवासी संघटनेची मागणीतुमसर : मंत्रालयातील आदिवासी उपसचिवाला आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या दालनात जावून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेले. तालुक्यातील आदिवासी संघटनेने घटनेचा निषेध केला आहे.ा त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.२९ मार्च रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा.र. गावित दालनात बसले होते. तिथे जावून आमदार कडू यांनी गावित यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून त्यांच्या कपाळावर जबर मारहाण केली होती. त्या विरोधात मंत्रालयातील कर्मचाऱ्याने एक दिवस काम बंदही केले होते. त्या घटनेचे तीव्र पडसाद आदिवासी समाजात पडले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या प्रतिनिधीवर प्रतिबंध घालावा. अनुसूचित जाती, जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, याकरिता भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघ, कर्मचारी संघ, पिपल्स फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदी संघटनेने तहसीलदार तुमसर यांना निवेदन सोपवले.यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश मरसकोल्हे, रामेश्वर धुर्वे, नरेंद्र मडावी, विकास मरसकोल्हेसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कडंूवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
By admin | Published: April 01, 2016 1:14 AM