वैश्विक महामारी कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी कोरोनामुळे दहाच्या वर कर्मचाऱ्यांचे निधन झाले. पंधराच्या वर कर्मचारी विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याही परिस्थितीत कारखान्यात कोविड-१९ चे पालन होत नसल्याबाबचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी व कोलकत्ता बोर्ड यांना देण्यात आले. दिनांक १७ मे रोजी आयुध कर्मचारी संघ, न्यू एक्सप्लोसियू फॅक्टरी वर्कर्स युनियन व डेमॉक्रेटिक युनियनद्वारे निर्माणीमध्ये ५०-५० टक्के धर्तीवर काम करणे, वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना ५० टक्के कामावर बोलाविणे व अत्यावश्यक विभागातील कामगारांना त्यांच्या संख्याबळानुसार संख्या कमी करणे, कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हर टाइम देण्यात यावा, याविषयी प्रथम प्रशासकीय अधिकारी एडमिन यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यात मागण्या मान्य न झाल्यास पुढे तीनही युनियनद्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लगेच एचओएस, डीव्हीओची सभा बोलाविण्यात आली. यात सदर मागण्या मान्य करीत ५०-५० टक्क्यांनुसार कारखाना चालविण्यासाठी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलाविण्यात येणार असल्याचे १७ मे रोजी निर्माणीच्या पत्रकात नमूद केले आहे.
...अखेर आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:38 AM