लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सितेपार झंझाड येथील रहिवासी शिला मेश्राम ही शेतात काम करीत असताना सापाने दंश केला. त्यामुळे तिला सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता आणण्यात आले. त्यानंतर तिचे निधन झाले. त्यामुळे शिला यांचे पोस्टमार्टम सामान्य रुग्णालय भंडाराला करण्यात आले होते.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मिळावा म्हणून अन्यायग्रस्त जगदीश मेश्राम यांनी कृषी अधिकारी मौदा यांच्याकडून सर्व कागदपत्रासह प्रकरण दाखल केले होते. त्यात पोस्टमार्टम डॉ. अर्चना मेश्राम यांनी मृत्यूचे कारण लिहून दिले नाही. त्यामुळे सदर प्रकरण नॅशनल इंन्शुरन्स कंपनी नागपूर यांनी प्रकरण वापस पाठविले. त्यामुळे डॉ. अर्चना मेश्राम यांना मृत्यूचे कारण लिहून द्यावे, अशी विनंती केली. डॉ. अर्चना मेश्राम पोलिसांचे नाव सांगत तर पोलीस डॉक्टरांचे नाव सांगून आॅफिसच्या हेलपाटे खावे लागत होते.त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यालय भंडारा समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाने याची दखल घेतली. उपोषण मंडपात डॉ. किशोर चाचेरे, डॉ. सुनिता भोयर यांनी भेट देऊन मृत्यूचे कारण असलेले प्रमाणपत्र दिले. उपोषणकर्त्याचे लिंबुपाणी पाजून सोडविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, सुरज परदेशी, मुन्ना कचुरी, अचल मेश्राम, कन्हैया नागपुरे, सुरेश निर्वाण, निकेत हुमणे, जितेंद्र लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते.
अखेर उपोषणकत्याला डॉक्टरांनी दिले प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:34 PM