लाखनी : लाखनी नगर पंचायतीच्या मागणीनुसार अग्निशामक वाहन अखेर बुधवारी लाखनी नगर पंचायतीला प्राप्त झाले.
राष्ट्रीय महामार्गावर वसलेले लाखनी हे महत्त्वाचे शहर आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाने किंवा अनेक घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासाठी स्वतःची स्वतंत्र अग्निशामक सेवा असणे आवश्यक होते. यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर तिथे होणारे नुकसान टाळता येईल. यापूर्वी लाखनी येथे आग लागल्यास भंडारा येथून अग्निशामक वाहन येत असे, यामध्ये बराच वेळ जात होता. यामुळे नुकसानाचे स्वरूप मोठे व गंभीर होते. आता दाखल झालेल्या अग्निशामक वाहनामुळे हे धोके टाळता येणार आहेत. १४ वा वित्त आयोग व जिल्हा विकास निधी यांच्या माध्यमातून ९० लाख रुपयांचे अग्निशामक वाहन खरेदी करण्यात आले आहे. अग्निशामक वाहन प्राप्त व्हावे, यासाठी नगर पंचायतीचे पदाधिकारी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रयत्न केले होते.
150921\img-20210915-wa0084.jpg
photo