शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

अखेर मच्छेराचे सरपंच पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:28 AM

याबाबद सविस्तर वृत्त असे की, सिहोरा वरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं मच्छेरा गावाची लोकसंख्या हजारच्या जवळपास आहे. या गावातील ...

याबाबद सविस्तर वृत्त असे की, सिहोरा वरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं मच्छेरा गावाची लोकसंख्या हजारच्या जवळपास आहे. या गावातील ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आठ आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत नोकेश्वर पारधी हे निवडून आले होते. मात्र सरपंच यांच्यावर सदस्यांना विश्वासात न घेता मानमर्जीचा कारभार करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. मात्र थेट निवडणुकीच्या शासन निर्णयात अडीच वर्षापर्यन्त सरपंच यांच्यावर अविश्वास घेता येत नसल्यामुळे सदस्य वेळेच्या प्रतीक्षेत होते. अनेक वेळी सरपंच सर्व सदस्य गणसोबत अपमानास्पद वागणूक करतात, ग्रामपंचायतच्या कारभारात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही. या विषयाला धरून सदस्य दीनदयाल टेंभरे, शैलेश शेंडे, प्रमिला कोकुडे, शिंधूबाई उरकुडे, रत्नमाला खानकुरे, आशा गजभिये यांनी दिनांक १२ ऑक्टोबरला तहसीलदार तुमसर यांच्या दालनात तक्रार सादर करण्यात आले. प्रभारी तहसीलदार अशोक पाटील यांनी या विषयावर पत्र काढत १९ ऑक्टोबरच्या दुपारी २.०० वाजता ग्रामपंचायत च्या इमारतीत सरपंचासह सर्व सदस्यांची बैठक बोलावली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या बैठकीत सर्व मुद्यावर चर्चा करून मतदान घेण्यात आले. घेण्यात आलेल्या मतदानात सर्व चे सर्व सात सदस्य, सरपंच नोकेस्वर पारधी यांच्या विरोधात अविश्वास दाखविल्याने शेवटी तहसीलदार यांनी तसा ठराव लिहीत सरपंच यांना पदावरून निरस्त केले होते. तात्पुरता कारभार उपसरपंच दीनदयाल टेंभरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मात्र या निर्णयाविरोधात सरपंच हे अपील मध्ये गेलेले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम २०१७ मधील कलाम ३१ मध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव संदर्भात कलम ३५ मधील पोटकलम १(अ ) अन्वये विशेष ग्रामसभेची आवश्यक आहे. त्यात जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचा आयोजन न झाल्यामुळे सरपंच यांच्या विरुद्ध कलम ३५ नुसार प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे. विशेष ग्रामसभेचे आयोजन जेव्हा पर्यन्त पूर्ण होत नाही तेव्हा पर्यन्त मच्छेरा ग्रामपंचायत सरपंच पदावर नोकेस्वर पारधी राहतील असा आदेश पारीत केल्याने पुन्हा सरपंच यांनी आपली जबादारी स्वीकारली होती. दरम्यान दिनांक २२ डिसेंबरला ग्रामसभेचे आयोजन करण्यासाठी ग्रामपंचायतला पत्र मिळाले. सात दिवसाच्या आधीपासून गावातील नागरिकांना ग्रामसभेत मतदान आपल्या बाजूनेच करावे यासाठी दोन्ही पक्षाकाकडून प्रचंड मेहनत घेण्यात आली. जणू गावांत निवडणुकांचं वातावरण तापविण्यात आले. २२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता तुमसरचे तहसीलदार तेळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन तर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. तर ग्रामसभेत आणि मतदान प्रक्रिया पार पाडत असतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्शवभुमीवर सिहोऱ्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी आपल्या फौजफाट्यासह पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावलेला होता. मतदान हे तीन वाजे पर्यन्त पार पडले. यात एकूण ४८९ मतदारांनी मतदान केले. आणि लगेच मतमोजणी ला सुरवात करण्यात आली. यात सरपंच नोकेस्वर पारधी यांच्या बाजूने १६३ तर विरोधात ३०१ मतदान पडले. तर २५ मतदान अवैध झाले. १३८ मतांनी सरपंच यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना सरपंच पदाची खुर्ची अखेर सोडावी लागली आहे. उपसरपंच दीनदयाल टेंभरें यांच्या कडे सरपंच पदाची तात्पुरती धुरा देण्यात आली आहे. २४ लोक ०३ के