मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत डोंगरला उद्यानाच्या कामात अनियमितता, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन रोपवाटीकेतील कामांची बनावट देयके असा गैरव्यवहार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेतून हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यानंतर चौकशीअंती सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी एफ. एम. राठोड यांना निलंबित करण्यात आले. आता विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.तुमसर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने डोंगरला येथे स्व.उत्तमराव पाटील उद्यान तयार करण्यात आले. २४ हेक्टर परिसरातील हे उद्यान तुमसर-बपेरा मार्गावर आहे. येथे वृक्ष लागवड, अंतर्गत रस्त्याचे मुरूमीकरण, लहान मुलांकरिता खेळाचे साहित्य, प्रसाधनगृह तथा अन्य कामांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र तुमसर परिसरात वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, रोपवाटिकेची कामे करण्यात आली होती. या कामांत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले.३४ लाख ५ हजार १०० रूपयांच्या कामापैकी ७ लाख १ हजार ५२५ रूपयांची कामे झालेली नाही. परंतु पैशांची मात्र उचल करण्यात आली. चौकशीअंती सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेतली.त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्राधिकारी एफ.एम. राठोड यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात लाचेची मागणी करणाºया विभागीय वनअधिकारी योगेश वाघाये यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुमसर सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवड प्रकरणात रस्त्यांच्या दोन्ही बाजुला वृक्ष लागवड करण्यात आली, परंतु फलकावर अंदाजपत्रकातील किंमत नमूद करण्यात आलेली नाही. वृक्ष लागवडीनंतर जंगलातील झाडे तोडून त्यांचे संरक्षणाकरिता उपयोग करण्यात आला आहे. औषधी खरेदी, किटकनाशक औषधे, इतर साहित्य, वृक्षांकरिता खत खरेदीची बनावट बिले तयार करण्यात आली होती.या प्रकरणाची तक्रार सामाजिक कार्यकर्ता कमलाकर निखाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर केली होती. त्यानंतर अवर सचिवांनी प्रधान मुख्यसरंक्षकांना चौकशीचे आदेश दिले. आमदार चरण वाघमारे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. या प्रकरणात पुन्हा किती मासे गळाला लागतात याकडे लक्ष लागून आहे.
अखेर वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:08 AM
तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत डोंगरला उद्यानाच्या कामात अनियमितता, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन रोपवाटीकेतील कामांची बनावट देयके असा गैरव्यवहार झाला होता.
ठळक मुद्देप्रकरण भ्रष्टाचाराचे : डोंगरला येथील उद्यानातील प्रकार