आॅनलाईन लोकमततुमसर : चांदपूर - ऋषीदेव मंदिराकडे जाणारा रस्ता वनविभागाने काही महिन्यापूर्वी नाली खोदून बंद केली होती. भाविकांनी मंदिराकडे जाणे बंद केले होते. याप्रकरणी डॉ.पंकज कारेमोरे यांनी उपवनसंरक्षक यांची भेट घेऊन रस्ता तात्काळ भाविकांकरिता दुरुस्त करण्याची मागणी केली. दोन दिवसात वनविभागाने नाली बुजवून भाविकांकरिता रस्ता मोकळा केला.चांदपूर येथे ऋषीदेवांचे जागृत मंदिर आहे. ऋषीपंचमीला येथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मंदिराकडे जाण्याकरिता मोठा रस्ता आहे. वनविभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने ३ फुट रुंद नाली खोदून भाविकांचा मार्ग बंद केला होता. काही महिन्यापूर्वी ही नाली खोदण्यात आली होती. सिहोरा येथील रामदास हेडावू व इतर भाविकांनी तुमसर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.पंकज कारेमोरे यांची भेट घेऊन समस्या सांगितली. डॉ.कारेमोरे यांनी शिष्टमंडळासह भंडारा येथे उपवनसंरक्षक हौशींग यांची भेट घेतली. रस्ता मोकळा करून नाली बुजविण्याची मागणी केली.दुसºयाच दिवशी वनविभागाने रस्त्यावरील नाली बुजविली. अन् रस्ता भाविकांकरिता मोकळा केला. तांत्रिक कारणामुळे सदर रस्ता बंद करण्यात आला होता, असे यापूर्वी वनविभाग सांगत होते. अनेक वर्षापूर्वी पासून मंदिरात भाविक जात होते. तांत्रिक कारण पुढे करून भाविकांना रोखल्यास आंदोलनाचा इशारा डॉ.पंकज कारेमोरे यांनी दिला होता.रस्ता मोकळा केल्याने भाविकामध्ये आनंद व्याप्त आहे.
अखेर ‘तो’ रस्ता भाविकांकरिता मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:03 PM
चांदपूर - ऋषीदेव मंदिराकडे जाणारा रस्ता वनविभागाने काही महिन्यापूर्वी नाली खोदून बंद केली होती.
ठळक मुद्देवनविभागाची तत्परता : पंकज कारेमोरे यांच्या प्रयत्नाला यश