लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील बसस्थानक जवळील पालिकेच्या जीर्ण गाळ्यांची पालिकेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाने यांनी सोमवारी पाहणी केली. विशेष म्हणजे रविवारी सकाळच्या सुमारास गाळा क्रमांक ४ मधील स्लॅब कोसळला होता. या सुदैवाने यात कोणतीही जीवतहाणी झाली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पालिका प्रशासनाने दखल घेतली.तीन दशकांपुर्वी बांधलेल्या या गाळ्यांची अवस्था जीर्ण झाली आहे. गाळे मालकांनीच देखभाल दुरूस्ती करून गाळे सुव्यवस्थीत ठेवले आहे. पालिकेने गाळ्यांच्या देखरेखीबाबत कानाडोळा केला. उल्लेखनीय म्हणजे १६ वर्षांपुर्वी या गाळ्यांच्या दुरूस्तीबाबत चंद्रभान साखरवाडे यांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले होते. त्यात गाळा क्रमांक ८ मधील स्लॅबचे प्लॉस्टर कोसळले होते. यावेळी साहित्यांचीही नासधुस झाली होती. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यातच रविवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे गाळेधारक चिंताग्रस्त झाले. सामाजिक कार्यकर्ता नितीन दुरगकर, संतोष कपूर, सभापती नितीन धकाते, जुनेद खान, युनुस मिस्त्री आदींनी एक निवेदन पालिकेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाने यांना दिले. त्याची दखल घेत जीर्ण झालेल्या या गाळ्यांची पाहणी केली. शौचालय, पाण्याची कोणतीही व्यवस्था नसताना जीर्ण गाळ्यांचे भाडे द्यावे काय, असा सवाल नितीन दुरगकर यांनी उपस्थित केला. स्वत: डागडुजी करायची व प्रशासनाने फक्त वेळकाढू पणाचे धोरण अवलंबवावे ही बाब योग्य नाही, असा सुरही यावेळी व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे याच गाळ्यांच्या मागे कोट्यवधी रूपये खर्च करून गाळ्यांचे नवीन बांधकाम काही वर्षापुर्वी करण्यात आले. मात्र त्यामधून एक रूपयांचा महसूल पालिकेला मिळालेला नाही. याचवेळी गाळे धारगांच्या वतीने आशिष गोंडाने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष कपूर, नितीन दुरगकर, युनुस मिस्त्री, नगरसेवक मंगेश वंजारी यासह अन्य गाळेधारक उपस्थित होते.
अखेर पालिकेच्या ‘त्या’ जीर्ण गाळ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 9:34 PM
येथील बसस्थानक जवळील पालिकेच्या जीर्ण गाळ्यांची पालिकेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाने यांनी सोमवारी पाहणी केली. विशेष म्हणजे रविवारी सकाळच्या सुमारास गाळा क्रमांक ४ मधील स्लॅब कोसळला होता. या सुदैवाने यात कोणतीही जीवतहाणी झाली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पालिका प्रशासनाने दखल घेतली.
ठळक मुद्देदखल लोकमतची : सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार, पालिका उपाध्यक्षांना दिले निवेदन