लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दीड महिन्यापासून नवोदय विद्यालयाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात प्रशासनाला शुक्रवारी काही अंश यश आले. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत प्रवेशित विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी या विद्यार्थ्यांना खास वाहनांद्वारे मोहाडीकडे रवाना केले. तसेच रखडलेला प्रवेशपूर्व परीक्षेचा निकालही लवकरच घोषित केला जाईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.जवाहर नवोदय विद्यालयात सातव्या वर्गात १९ मुले आणि १७ मुली असे एकूण ३६ जण निवासी शिक्षण घेत आहे. जकातदार कन्या विद्यालयाची इमारत क्षतिग्रस्त झाल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. पालकांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले. प्रशासनाने या विद्यार्थ्यांची व्यवस्था अल्पसंख्याक इमारतीत केली. मात्र विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने यात पुढाकार घेत मोहाडी येथील माविमंच्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत विद्यार्थ्यांना स्थानांतरीत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. त्यावरून विद्यार्थ्यांना विशेष बसद्वारे मोहाडीकडे रवाना करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ देवून तोंड गोड केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, नवोदयचे प्राचार्य आंभोरे, इतर अधिकारी, पालक उपस्थित होते.
अखेर नवोदय मोहाडी 'माविमं'मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 9:27 PM
गत दीड महिन्यापासून नवोदय विद्यालयाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात प्रशासनाला शुक्रवारी काही अंश यश आले. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत प्रवेशित विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी या विद्यार्थ्यांना खास वाहनांद्वारे मोहाडीकडे रवाना केले.
ठळक मुद्देविद्यार्थी रवाना : पूर्व परीक्षेचा निकालही लवकरच