साकाेली नगर परिषद ही जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची नगर परिषद आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साकाेलीचा वेगाने विस्तार हाेत आहे. शक्य तितक्या मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न नगरसेवकाकडून केला जात आहे. परंतु वाढत्या लाेकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा याेजना तुटपूंजी ठरत हाेती. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत हाेती. ही अडचण नगरसेवकांनी आमदार डाॅ. परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुसंगाने डाॅ. फुके यांनी २७ मे राेजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र लिहिले. सुवर्णजयंती नगराेत्थान महाअभियानांतर्गत साकाेली नगरपरिषदेला पाणीपुरवठा याेजना मंजुर करण्याची विनंती केली. गॅरेजमधून पाणी मिळण्यासाठी आरक्षण देण्यात यावे असे पत्रात नमूद हाेते. पाणी आरक्षणाचा निर्णय विदर्भपाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना असून कार्यकारी संचालकांना तशी परवानगी द्यावी असेही नमूद केले हाेते.
त्याअनुषंगाने मंगळवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माेहिते यांनी पाणीपुरवठा आरक्षणावर चर्चा केली. निम्न चुलबंद प्रकल्पातून पाणी पुरवठा आरक्षणाच्या प्रस्तावास मान्यता देत तसे पत्र आमदार फुके यांच्या उपस्थित साकाेलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत यांना दिले. यावेळी नगर परिषदउपाध्यक्ष जगन उईके, नगरसेवक रवी परशुरामकर, मनीष कापगते, पुरुषाेत्तम काेटांगले, हेमंत भारद्वाज, ईश्वर राऊत उपस्थित हाेते.
बाॅक्स
लवकरच तांत्रीक मान्यता
साकाेली नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा याेजनेला लवकरच तांत्रीक मान्यता प्रदान करण्यासाठी आपण प्रयत्न करु आणि शक्य तितक्या लवकर त्या याेजनेचे काम सुरु करणार असल्याचे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच साकाेलीचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.