आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : गेल्या सहा वर्षापासून बंद असणाऱ्या ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात आ. चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने संजिवनी देण्याचे प्रयत्न सुर झाले आहे. पर्यटन स्थळात असणाºया जिर्ण विश्रामगृहाचे पर्यटन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे. यामुळे पर्यटन स्थळाला अच्छे दिन येणार आहे.भंडारा जिल्ह्यातील एकमेव ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला सन २०१२ पासून उतरती कळा लागली आहे. गेल्या सहा वर्षापासून पर्यटन स्थळ बंद असल्याने पर्यटकांत नाराजीचा सुर आहे. पर्यटन स्थळ बंद होताच अनेक बेरोजगार तरुणांवर उपासमारीची पाळी आली आहे. याशिवाय परिसरात असणाºया व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम झाल्याचे अनुभवास आले आहे.या पर्यटन स्थळात १९०३ मध्ये ब्रिटीश कालीन विश्राम गृहाचे बांधकाम करण्यात आले होते. या विश्रामगृहाचे देखभालीची जबाबदारी स्थानिक पाटबंधारे विभागाचे अखत्यारित होती. या विश्रामगृहाचा ताबा पर्यटन स्थळाचे कंत्राटदाराकडे देण्यात आला होता. पर्यटन स्थळाचा कंत्राट संपताच विश्रामगृहाची नासधुस करण्यात आली आहे. यानंतर पर्यटन स्थळाला बंद करण्यात सहा वर्षाचे कालावधीत नविन निविदा काढण्यात आली नाही. पय्रटन स्थळ सुरु करण्याची ओरड सुरु झाल्याने महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाकडे ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळाचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हस्तांतरण करण्यात आले. या विभागाने पर्यटन स्थळात सर्वेक्षण केले. परंतु विकासाला गती देण्यात आली नाही. अनेक वर्षाचा कालावधी ओलांडले जात असतांना आ. चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळाला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. पर्यटन विभागाला ०.५४ आर जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ३ कोटी रुपयांचे खर्चातून विश्रामगृहाचे बांधकाम होणार आहे. याशिवाय पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी मास्टर प्लान वर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे पर्यटन स्थळात कॉटेज हॉटेल, बोटींग तथा मनोरंजनाची साधने निर्माण केली जाणार आहे. पर्यटन स्थळाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे.पर्यटन विकास सोबत तिर्थस्थळ पॅकेज देण्याची गरज आहे. जागृत हनुमान देवस्थानचा विकास प्रभावित आहे. पर्यटन व तिर्थस्थळ यांच्या संयुक्त विकास झाल्यास चांदपूर गाव आकर्षणाचे केंद्र ठरेल.- उर्मिला लांजे,सरपंच चांदपूर
अखेर जीर्ण विश्रामगृहाचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:38 PM
गेल्या सहा वर्षापासून बंद असणाऱ्या ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात आ. चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने संजिवनी देण्याचे प्रयत्न सुर झाले आहे. पर्यटन स्थळात असणाºया जिर्ण विश्रामगृहाचे पर्यटन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्देतीन कोटीतून नव्याने बांधकाम होणार : पर्यटनस्थळात मास्टर प्लानची अमलबजावणी