प्रशासनाची उडाली तारांबळ : कामावर पडला परिणाम, वीज पुरवठ्याअभावी कर्मचाऱ्यांना उकाळा असह्यप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जि. प. प्रशासकीय इमारतीत असलेल्या आरोग्य विभागाचा विद्युत पुरवठा गुरुवारला बंद होता. यामुळे येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. याबाबद ^‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली. वृत्तानंतर आरोग्य विभागातील विद्युत पुरवठा आज बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुर्ववत सुरु करण्यात आला. गुरुवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथील विद्युत पुरवठा पुर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे संगणक प्रणालीवर होणारे कामकाज प्रभावीत झाले. आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या साथरोग, एनएचआरएम, संगणक कक्ष हे प्रभावित झाले. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील कर्मचारी कार्यालयाएवजी बाहेर भटकंती करताना दिसून आले. आरोग्य विभागाच्या वीज पुरवठ्याबाबद देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. मात्र या विभागाने पुढील आठ दिवस निधीची तरतुद झाल्यानंतर वीज पुरवठा पुर्ववत होईल, अशी भूमिका घेतली होती. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात ‘पाच दिवसापासून आरोग्य विभागाची बत्तीगुल’ या शिषर्काचे वृत्त प्रकाशित केले. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. ज्या बांधकाम विभागाने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी कारणंमिमांसा केली. यानंतर बांधकाम विभागाने तातडीने येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या. शॉर्ट सर्किटमुळे जळालेले वायरींग व अन्य साहित्य तातडीने खरेदी केले. आज बुधवारला आरोग्य विभागाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले. मागील सात दिवसांपासून अंधारात चाचपळणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी उकाळ्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यानी लगतच्या बांधकाम व समाजकल्याण सभापतीच्या कक्षातून तात्पूरती विद्युत जोडणी घेवून कुलर सुरु केले होते. मात्र तब्बल सात दिवसानंतर आज विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांनी उकाळ्यातून सुटकेचा नि:श्वास सोडला.मानले लोकमतचे आभारगुरुवारला शॉर्टसर्किटमुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला. एक -दोन नव्हे तर तब्बल पाच दिवसानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबत मंगळवारला लोकमतने वृत्त प्रकाशित केले. यामुळे जि.प. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करुन दिला. खंडीत वीज पुरवठा सुरळीत झाला त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी लोकमतच्ये आभार मानले.
अखेर सातव्या दिवशी आरोग्य विभागात झगमगाट
By admin | Published: June 01, 2017 12:29 AM