लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील ४० गावातील अंगणवाडी मध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचत गटाच्या ४८ महिला यांचे १० महिन्यांपासून आहार बनविण्याचे बिल मिळाले नाही. थकीत महिन्याचे बिल काढा या मागणीसाठी १५ फेब्रुवारी पासून आहार बनविने बंद करून एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय लाखांदुर समोर ४८ महिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. १६ फेब्रुवारी रोजी आमदार बाळा काशिवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या मंजुर करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर लिंबुपाणी पाजुन उपोषण मागे घेतले.तालुक्यातील ६० गावात अंगणवाडी मध्ये आहार बनविणाऱ्या महिला बचत गटांना बिलाची देयके मागील १० महिन्या पासून थकीत आहेत.मात्र संबंधित बचत गटांनी वरीष्ठाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्याकडे सवार्नीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे तालुक्यातील विविध गावातील ४८ महिला १५ फेब्रुवारी रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय लाखांदुर समोर बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणकर्त्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे एक रेशिपी तपासणी साठी ३०० रुपयांपर्यंत खर्च येत असतांना संबंधित कर्मचारी ह्या सदर रेसिपी तपासणीसाठी ७०० ते ९०० रुपये घेतल्याची ही माहिती दिली.तालुक्यातील २० ते २५ गावातील अंगणवाडी मध्ये आहार शिजविण्याचे काम तेथील सेविका व मदतनीस करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानधन मिळत असल्यामुळे सदर ठिकाणचे आहार बनविण्याचे काम हे त्या गावातील महिला बचत गटाला देण्यात यावी, या मागण्यांना घेवून उपोषणाला प्रारंभ केला होता. यासंदर्भात आमदार बाळा काशिवार यांना माहीती मिळताच त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांच निराकरण केल व अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडून समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले.यावेळी सभापती मंगला बगमारे, उपसभापती शिवाजी देशकर, खंडविकास अधिकारी डि.एम.देवरे, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, भाजपा तालुकाध्यक्ष नुतन कांबळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष हरीष बगमारे, नगराध्यक्षा निलम हुमने, उपाध्यक्ष नरेश खरकाटे, नगरसेवक प्रल्हाद देशमुख, रमेश मेहंदळे, पंचायत समिती सदस्य कुंडलिक पेलने, नेहा बगमारे, विजय खरकाटे, भारत मेहंदळे, भुषण चिञिव, रजत गौरकर, यश खञी, जितेंद्र ढोरे, तुलसीदास बुरडे, गिरीष भागडकर, रिजवान पठान, दादाजी तुरबुडे, संजय राऊत, विनोद ढोरे यांच्यासह उपोषणकर्त्या ४८ महिला उपस्थित होत्या.
अखेर ‘त्या’ महिलांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:09 AM
तालुक्यातील ४० गावातील अंगणवाडी मध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचत गटाच्या ४८ महिला यांचे १० महिन्यांपासून आहार बनविण्याचे बिल मिळाले नाही.
ठळक मुद्देबाळा काशिवार अर्थसंकल्पात मांडणार प्रश्न