लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील केसवाडा वाघ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या साहायक शिक्षिका अल्का फकीरा करेले यांनी एका विद्यार्थीनीला बेदम मार दिल्याने पालकांच्या मागणीवरून शिक्षण विभाग पंचायत समिती लाखनी यांनी रेंगोळा / मांगली येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.शालेय परिसरात इयत्ता १ ली विद्यार्थीनी व इयत्ता चवथीच्या विद्यार्थिनीचे भांडण झाले. यात १ लीची विद्यार्थीनीने वर्गशिक्षिकांकडे तक्रार केले यात इयत्ता चवथीची विद्यार्थीनी मुस्कान अशोककुमार विश्वकर्मा हिला वर्गशिक्षिका करेले यांनी कानावर मारले यात सदर विद्यार्थीनी बेशुद्ध पडली. रात्र तिची प्रकृती अस्वस्थ असल्याने तिला लाखनीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.शाळा समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी पालक व गावकºयांनी आज १० वाजता १ हजार लोकांनी घेराव केला.सदर शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली.विद्यार्थीनीचे पालक अशोक विश्वकर्मा यांनी लाखनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सदर शिक्षिका ज्या शाळेत असेल तेथे तक्रारी असतात असे वृत्त आहे. शाळा समिती अध्यक्ष किशोर डॉ. श्रीकांत भुसारी, दिनेश वासनिक, पं.स. सभापती सुनिता आत्राम, प्रभारी खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी श्रीकांत नागलवाडे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बावनकुळे यांनी समन्वय निर्माण करून परिस्थिती आटोक्यात आणली. साहायक शिक्षिका करेले यांची बदली रेंगोळा येथे करण्यात आली.गावकरी व पालकांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. शिक्षिकेला पालकांच्या तक्रारीवरून तात्पुरते स्थानांतरण करण्यात आले आहे. सदर शिक्षिकेची प्रशासकीय चौकशी करून कारवाई करण्यात येईल.-सुभाष बावनकुळे,वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. लाखनी.
अखेर साहायक शिक्षिकेचे स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:30 PM
तालुक्यातील केसवाडा वाघ येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या साहायक शिक्षिका अल्का फकीरा करेले यांनी एका विद्यार्थीनीला बेदम मार दिल्याने ...
ठळक मुद्देविद्यार्थिनीला बदडल्याचे प्रकरण : पालकांनी केले शाळा बंद आंदोलन