शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 12:32 PM

आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे.

ठळक मुद्देपहाटे ५ वाजताची घटनाअज्ञाताने आग लावल्याचा संशय

भंडारा : मोहाडी तालुक्याच्या आंधळगाव येथील होलसेल कापड दुकानाला गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत दुकान पूर्णत: भस्मसात झाले असून जवळपास तीस लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. हे दुकान ओमशंकर सोनकुसरे यांच्या मालकीचे असून अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटर या होलसेल कापड दुकानाला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच मोहाडी येथून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले व आगीवर ताबा मिळवला. सकाळी ९-९:३० पर्यंत आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आले. 

या घटनेत दुकानातील साडेतीन लाखांच्या रोकडसह ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली. तर, दुकानाबाजुला असलेल्या एका घरालाही आगीच्या झळा पोहोचल्या. आगीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानमालक ओम प्रकाश सोनकुसरे हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी कुणीतरी अज्ञाताने ही आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :fireआग