लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील सिंदपुरी येथील एका शेतात ठेवलेल्या तणसाच्या ८०० बंधांना आग लागून भस्मसात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत सुदैवाने ४० जनावरे बचावली.निरंजना ताराचंद कटनकर यांचे सिंदपुरी शिवारात शेत आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या शेतातील तणसाच्या बंधांना अचानक आग लागली. आगीचे डोंब गावापर्यंत दिसत होते. गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली. मोटारपंपाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पाण्याचा मारा करूनही आग नियंत्रणात आली नाही. संपूर्ण तणस काही वेळातच जळून खाक झाले. या तणसाच्या एटालगतच गोठा आहे. या गोठ्यात ४० दुधाळ जनावरे ठेवली होती. आग या गोठ्याकडे पसरू नये म्हणून ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्यात ४० जनावरे सुदैवाने बचावले.या आगीने रौद्र रुप धारण केले होते. मंगळवारी दुपारपर्यंत आगीचे लोट दिसत होते. घटनास्थळी जिल्हा परिषदेचे सभापती धर्मेंद्र तुरकर, पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, मोहगावचे सरपंच उमेश कटरे यांनी भेट देऊन पाहणी केली. राज्य शासन तथा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कटनकर परिवाराला आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली.
आगीत ८०० बंध तणस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:40 PM
तालुक्यातील सिंदपुरी येथील एका शेतात ठेवलेल्या तणसाच्या ८०० बंधांना आग लागून भस्मसात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत सुदैवाने ४० जनावरे बचावली.
ठळक मुद्देसिंदपुरीची घटना : ४० दुधाळ जनावरे थोडक्यात बचावली