लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील भिलेवाडा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक जनावरांच्या गोठ्यासह घरांना लागलेल्या आगीत जवळपास ११ लाख रूपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या आगीत गोठ्यातील जनावरे आगीत होरपळून जागीच ठार झाले.जनावरांच्या गोठ्याला अचानकपणे लागलेल्या आगीत भजनदास कवळू डोळस यांच्या मालकीची जनावरे दगावली. ही आग शेजारी राहणाऱ्या राजहंस बांडेबुचे यांच्या घरालाही लागली. तसेच त्यांच्या शेजारी असलेले प्राणहंस बांडेबुचे, ज्ञानेश्वर बांडेबुचे, तुळशीराम खवास, भोजराम खवास व दुधराम खवास यांच्या घरांनाही आग लागली. या आगीत भजनदास डोळस यांचे पाच लाख रूपयांचे तर राजहंस, प्राणहंस व ज्ञानेश्वर बांडेबुचे यांचे प्रत्येकी दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.खवास यांनाही आर्थिक फटका बसला आहे. या आगीत घराचे मयाली, शेतीचे साहित्य व जीवनापयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी बरीच मेहनत घेतली. अग्नीशमन बंबालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी भेट दिली.
भिलेवाडा येथे आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:23 AM
तालुक्यातील भिलेवाडा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक जनावरांच्या गोठ्यासह घरांना लागलेल्या आगीत जवळपास ११ लाख रूपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या आगीत गोठ्यातील जनावरे आगीत होरपळून जागीच ठार झाले.
ठळक मुद्दे११ लाखांचे नुकसान : आगीत जनावरे होरपळून ठार