लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील तुडका येथे शनिवारी दुपारी लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली असून तीन शेळ्या, एक गाय आणि एक वासरु या आगीत ठार झाले. गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. तर तुमसरचे अग्नीशमन बंब येईपर्यंत तिनही घरे भस्मसात झाली होती.तुडका येथील मधुकर वाडीभस्मे यांच्या घराला दुपारी १ वाजताच्या सुमारास मिटरमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. ही आग जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात पोहचली. क्षणार्थात आगीने रौद्र रुप धारण केले. सुरेश पंधरे व गोविंद भिवगडे यांच्या घरालाही आग लागली. गावकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तुमसरवरून अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत दोन्ही घरे जळून भस्मसात झाली होती. वाडीभस्मे यांचे घर व गोठा जळाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.गावकऱ्यांचे प्रयत्नभर उन्हात आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मिळेल त्या साधनाने पाणी ओतून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु झाला. परंतु तापत्या उन्हामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. अखेर घरे भस्मसात झालीत.आगीत घरातील कपडेलत्ते, अन्नधान्य यासह सायकल, मोटारसायकल भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले.
तुडका येथील आगीत तीन घरे भस्मसात, पाच जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:49 AM
तालुक्यातील तुडका येथे शनिवारी दुपारी लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली असून तीन शेळ्या, एक गाय आणि एक वासरु या आगीत ठार झाले. गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. तर तुमसरचे अग्नीशमन बंब येईपर्यंत तिनही घरे भस्मसात झाली होती.
ठळक मुद्देलाखोंचे नुकसान । अग्निशमन बंब येईपर्यंत घरांची झाली राखरांगोळी