आॅनलाईन लोकमतभंडारा : येथील एका दुचाकी शोरूमच्या वर्कशॉपमध्ये वेल्डींगचे काम सुरू असताना अचानक ठिणगी उडाल्याने आग लागली. यात चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळील आरएन बजाज या दुचाकी शोरूममध्ये घडली. अग्नीशामन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.शहरातील वर्दळीच्या बसस्थानक परिसरात हेमंत महाकाळकर यांचे बजाज कंपनीचे दुचाकी शोरूम आहे. शनिवारी सायंकाळी शोरूमच्या खालच्या भागात वर्कशॉपमध्ये एका दुचाकीच्या इंधन टाकीचे वेल्डींगचे काम सुरू होते. दरम्यान तिथून ठिणगी निघाली. या ठिणगीमुळे तिथे असलेल्या आॅईलने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये वर्कशॉपमधील काऊंटरवर कॅबीन, कॉम्प्युअरचा रॅक इतर साहित्य आगीत जळाले. या घटनेची माहिती बाहेर होताच या शोरूमसमोर नागरिकांनी एक गर्दी केली.
दुचाकी वाहनाच्या शोरूमला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:37 PM
येथील एका दुचाकी शोरूमच्या वर्कशॉपमध्ये वेल्डींगचे काम सुरू असताना अचानक ठिणगी उडाल्याने आग लागली.
ठळक मुद्देचार लाखांचे नुकसान : अग्निशमन दलाने मिळविले आगीवर नियंत्रण