शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

By admin | Published: July 02, 2017 12:22 AM

जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ आज शनिवारला जिल्हाभरात करण्यात आला. भंडारा जिल्ह्याला ७ लाख ६८ हजार वृक्षांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वनविभागाने १ लाख ३६ हजार ८४८, ग्रामपंचायत विभागाने ६३ हजार १५० व अन्य विभागाने २६०० असे एकूण २ लाख २ हजार ५९८ वृक्ष लावण्यात आले. ही आकडेवारी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व शुध्द आॅक्सीजन मिळण्यासाठी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षसंवर्धनासाठी दोन झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे तीन वर्ष जोपासणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रूपये, जास्त वृक्ष जगविणाऱ्या शाळेला दहा हजार रूपये तर जिल्ह्यात पहिल्या येणाऱ्या शाळेला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारला केली.वनविभागाच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै वृक्ष लागवड सप्ताह माटोरा गावातील रोपवनात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वृक्षलागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक वनिकरण विभागीय अधिकारी योगेश वाघाये, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भोगे उपस्थित होते.वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त जिल्ह्याला सात लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालयात ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करता येणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा संस्थांनी वृक्षारोपण केले नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या मोकळया जागेत ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण करून या लोकअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.