किसनपूर गावाची लोकसंख्या ५०७ असून, कुटुंब संख्या १०७ आहे. गावात पोवार, गोंड, ढिवर, माली, गोवारी समाजाचे वास्तव्य असून, ० ते १७ वर्ष वयोगटातील १४३, तर लसीकरणास पात्र १८ वर्ष व त्यापुढील लोकसंख्या ३६४ लोक आहे. लसीकरणासाठी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, प्रभारी तहसीलदार टेळे, तालुका व करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. यासाठी पथक तयार करून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
पथकामध्ये आशासेविका रितू बिसेन, पोलीसपाटील विजू आंबेडारे, अंगणवाडीसेविका निर्मला पटले, मदतनीस लक्ष्मी बिसने, ग्रामपंचायत सदस्य मिताराम राऊत, राधेश्याम उईके, मुख्याध्यापक बसंता साठवणे, शिक्षक मुकुरणे व आरोग्यसेविका लता सोनवाने, मदतनीस गोबाडे आदींचा समावेश होता. सर्वांच्या पुढाकारातून १८ ते ७० वयोगटातील सर्वांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले. यासाठी जांभोरा गट ग्रामपंचायत कोविड पथकातील सरपंच वनिता राऊत, उपसरपंच यादोराव मुंगमोडे, माजी सरपंच भुपेंद्र पवनकर, राधेश्याम उईके, विनायक परतेकी, मुकेश फुले, अर्चना गोबाडे, सुनीता नाकाडे, ग्रामसेवक वाढई, तलाठी कांबळे, कोतवाल अनिल वैद्य, सुनीता मुंगुसमारे, वैशाली राऊत, माधुरी ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी व अन्य लोकांचे विशेष सहकार्य लाभले.
बॉक्स
कोरोनायोद्ध्यांची धडपड अभिनंदनीय
किसनपूर लसवंत गाव होण्यासाठी कोरोनायोद्धे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे. या सर्वांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादित करीत लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात यश संपादित केले. यासाठी स्थानिक स्तरावरील आरोग्य, पंचायत व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कोतवाल अनिल वैद्य यांची धडपड अभिनंदनास पात्र असल्याची प्रतिक्रिया मोहाडीचे नायक तहसीलदार सोनकुसरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
040921\1721-img-20210904-wa0106.jpg
किसनपूर मोहाडी तालुक्यातील पहिले 'लसवंत' गाव