प्रकरण महिलेच्या खुनाचे : आणखी आरोपींचा शोध सुरूभंडारा : पैशासाठी प्रीती पटेल यांचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सचिन राऊत (१९) आणि आमिर इजाज शेख रा.तकीया वॉर्ड या दोन आरोपींना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.राऊत व शेख या दोन आरोपींना प्रीती पटेल या महिलेचा निर्घृण खून केला तर अश्विनी शिंदे हिला बेदम मारहाण केली. यात प्रीतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अश्विनीवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. गुरुवारला दुपारी या दोन आरोपींनी रवींद्र शिंदे यांच्या घरात शिरून अश्विनीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या घरून ऐवज चोरुन नेला होता. त्यानंतर रात्री ८ वाजता याच आरोपींनी समृद्धीनगरातील रुपेश पटेल यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची पत्नी प्रीती पटेल यांचा खून करुन घरातील ऐवज लांबविला होता. भंडारा पोलिसांनी १२ तासात या आरोपींना अटक केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)वकिलांनी नाकारले आरोपींचे वकीलपत्रभंडारा : हृदयाचा थरकाप उडवून देणाऱ्या प्रीती पटेल यांचा खून करणाऱ्या सचिन राऊत (१९) आणि आमिर इजाज शेख रा.तकीया वॉर्ड या दोन आरोपींचे वकिलपत्र घेण्यासाठी भंडारा जिल्हा बार असोसिएशनने नकार दिला आहे. यासंदर्भात बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड.विनोद भोले यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. त्या आशयाचे प्रसिद्धीपत्रही जारी केले आहे. या निवेदनावर सचिव राजन उके, उपाध्यक्ष एस.बी. चव्हाण, सहसचिव ए.ए. भुजाडे, कोषाध्यक्ष डी.ए. नखाते, सदस्य एम.टी. बेदरकर, के.एन. पालीया, ए.एम. खराबे, उल्का खडीक, आर.के. सक्सेना, व्ही.एम. दलाल, एम.एम. चव्हाण, डी.के. वानखेडे, व्ही.के. पशीने, के.एम. अंबादे, व्ही.के. स्वामी, निला नशिने, आरिफ खान, के.एन. बावनकर, कैलास भुरे, डी.डी. देवगडे या बार असोसिएशनच्या वकिलांची स्वाक्षरी आहे.
‘त्या’ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: August 02, 2015 12:46 AM