नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गोबरवाही ते हेटी दरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम सुरू केले होते. परंतु पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. सध्या या भुयारी पुलात सुमारे पाच फूट पाणी साचले आहे. त्यामुळे पुलातून मार्गक्रमण कसे करावे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
मागील एक वर्षापासून रेल्वे प्रशासनाने पुलाचे बांधकाम थांबविले आहे. जमा झालेला पाणी निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था येथे करण्यात आली नाही. त्यामुळे पुलांमध्ये पाणी जमा होत आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था येथे करण्याची गरज आहे. लाखो रुपये खर्च करून हा पूल बांधकाम सुरू केल्यानंतर त्याला मध्येच थांबवण्यात आले. भुयारी पुलात पाणी निचऱ्याची तांत्रिक सोय येथे करण्यात आली नाही. त्यामुळे पुलात पाणी जमा होत असल्याची माहिती आहे.