लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यटकांची संख्येवर भर देण्याच्या उद्देशाने वनसंपदेने नटलेल्या पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पाच वाघिणी सोडण्यात येणार आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पर्यटनवाढीला वाव असून या निर्णयामुळे रोजगार निर्मितीवर भरही देण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनीही दुजोरा दिला आहे.वाघ आणि बिबटाच्या शिकारीने दोन महिन्यांपासून हादरून सोडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. या घटनांमुळे शिकारीच्या घटना घडत असल्याच्या बाबीवर शिकामोर्तब झाले आहे. तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या ‘जय’ नामक वाघाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. त्यानंतरही वाघ, बिबट, हरिण, निलगाय यांच्या शिकार होण्याचा घटना सातत्याने घडल्या आहेत. एकट्या तुमसर वनपरिक्षेत्रात डझनभर वाघांची संख्या असल्याचे बोलले जाते. याला दबक्या आवाजात वनाधिकारी दुजोरा देतात. मात्र गत दोन महिन्यात घडलेल्या घटनांमुळे पूर्व विदर्भातील वाघांच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.दरम्यान वनविभागाने यासंदर्भात शिकार प्रकरणी कारवाईचा शिकंजा कसलेला आहे. याबाबत खुद्द पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तस्करांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. आता पवनी-कºहांडला-उमरेङ या व्याघ्र प्रकल्पासह भूर्व विदर्भातील वनजंगलात पाच वाघिण सोडण्यात येणार आहे.नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात पाच वाघिणी सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात कार्य सुरू आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे.- डॉ. परिणय फुकेपालकमंत्री, भंडारा-गोंदिया
पाच वाघिणी पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:06 PM
पर्यटकांची संख्येवर भर देण्याच्या उद्देशाने वनसंपदेने नटलेल्या पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पाच वाघिणी सोडण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देरोजगार निर्मितीकडेही लक्षपर्यटक संख्या वाढीवर भर